संपूर्ण ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्रज्ञान

ड्रॅगन फ्रूट संपूर्ण लागवड तंत्रज्ञान तसेच ड्रॅगन फ्रूटचे फायदे

ड्रॅगन फ्रूटचे उगमस्थान

मित्रांनो ड्रॅगन फ्रूट चे फळ दिसायला सुंदर व आकर्षक असते हे केक्टस म्हणजे कोरफड परिवरातील वनस्पती असून याची लागवड मेक्सिको, ईस्राईल, श्रीलंका, थायलंड, मलेशिया,  फिलिपिन्स, संयूक्तराष्ट्र अमेरिका तसेच व्हीयतनाम यासारख्या देशामधे व्यापारी तत्वावर केलीजाते. ड्रॅगन फ्रूटचे मूळ नाव हायलोसिरियस अंडाटस (Hylocereus Undatus) असून या वनस्पतीला पानी टंचाई निर्माण झाली तरीही याचे झाड कायमचे जाळून जात नाही. परंतु फळांचा आकार कमी होतो म्हणजे फळे लहान आकाराचे येतात परंतु झाडे जीवंत राहतात. ड्रॅगन फ्रूट या पिकाला कीड व रोगांचा प्रादुर्भाव नगण्य आहे. यामुळे पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. 

ड्रॅगन फ्रूटची भारतातिल लागवड

ड्रॅगन फ्रूटची आपल्या भारतात देखील बर्‍याच प्रमाणात लागवड झालेली दिसून येते यामध्ये तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यात लहान क्षेत्रावर व्यापारीक दृष्ट्या ड्रॅगन फ्रूटची लागवड होताना पहायला मिळते. याच बरोबर महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशामद्धे  उदा. उस्मानाबाद, औरंगाबाद, सोलापूर, पुणे, सांगली, बीड या जिल्ह्यांमध्ये देखील ड्रॅगन फ्रूटची व्यापारीक दृष्ट्या लागवड झालेली पहायला मिळते.

ड्रॅगन फ्रूटचे औषधी गुणधर्म

मित्रांनो ड्रॅगन फ्रूट चे फळ दिसायला जितके सुंदर व आकर्षक आहे तितकेच पोष्टिक म्हणजेच औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे.  ड्रॅगन फ्रूटचे फळ शरीरातील पेशी कमी झाल्यानंतर किंवा डेंगू व मलेरिया यासारख्या आजारामध्ये खाल्यास रोगप्रतीकारक शक्ति वाढवण्याचे काम करते तसेच पांढर्‍या पेशींची देखील वाढ होण्यास मदत करते. याच बरोबर ड्रॅगन फ्रूटच्या फळामद्धे नेसर्गिक एनटीओक्सिडेंट चा प्रभाव तसेच फ्लेवोनोईड, फेनोलिक एसिड, एस्कोर्बिक एसिड व फायबर असते ज्यामुळे रक्तातील शुगरचे प्रमाण काही प्रमाणात नियंत्रित होते. याच बरोबर ह्रदय या संबंधी रोग, कोलेस्ट्रॉल, पोटासंबंधी आजार, हडांचे तसेच दातांचे आजार याच बरोबर कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी देखील ड्रॅगन फ्रूट चे फळ अत्यंत उपयुक्त आहे.

ड्रॅगन फ्रूटच्या फळाचे प्रक्रिया उद्योग

ड्रॅगन फ्रूट चे फळ खाण्यासाठी जितके उपयुक्त आहे तितकेचे याचे बरेचशे पदार्थ देखील बनवले जातात यामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या फळांचा रस, जाम, काढा (सिरप), सरबत आईस्क्रीम, कॅन्डि, मुरंबा (जेली), पेस्ट्री यासारखे पदार्थ बनवण्यासाठी वापरतात याच बरोबर पिझा किंवा वाईन बनवण्यासाठी देखील याचा वापर केलाजतो. 

ड्रॅगन फ्रूट साठी लागणारे हवामान

ड्रॅगन फ्रूट हे उष्ण कटिबंधीय प्रदेशातील फळझाडी असून यापिकाला चांगल्या वाढीकरिता साधारनतः २५ ते ३५ अंश से.ग्रे. तापमान चांगले असते अश्या तापमानात या पिकाची चांगली वाढ होते. याच बरोबर वार्षिक ५०० ते १००० मि.मि. पावसाचे प्रमाण असणारा प्रदेश तसेच थोड्या फार प्रमाणात दमट हवामान असणार्‍या परदेशात ड्रॅगन फ्रूट च्या झाडांची तसेच फळांची चांगल्या प्रमाणात वाढ होते. प्रामुख्याने ड्रॅगन फ्रूटच्या फळवाढीच्या काळात भरपूर सूर्यप्रकाश असावा, परंतु सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त काळ झाडावर तसेच फळावर नसावी सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त काळ रहा असल्यास झाडांना सावली करण्याची गरज भासू शकते.

ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी जमीन

ड्रॅगन फ्रूटची लागवड करत असतांना जमिनीची निवड करताना एक लक्षात घावे की ड्रॅगन फ्रूट हे कमी पाण्यावर येणारे पीक आहे यामुळे जमीन निवडतांना हलकी ते मध्यम तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणार्‍या जमिनीची निवड करावी तसेच वालुकामय व जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ उपलब्ध असणार्‍या जमिनीची निवड करावी यामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या झाडांची वाढ ही भारी जमीनीवरील ड्रॅगन फ्रूटच्या झाडांपेक्षा जोमाने होते. अधिक उत्पणा साठी यापिकास शेंद्रिय खतांचा म्हणजेच शेणखतांचा वापर करावा.

ड्रॅगन फ्रूट मंडप किंवा खांब उभारणी
ड्रॅगन फ्रूट हे फळ वेलवर्गीय असल्यामुळे त्याच्या वाढीसाठी खांबाच्या आधाराची गरज असते यासाठी ड्रॅगन फ्रूट लागवड करत असतांना प्रत्येक वेलीला खांबाच्या आधाराची  गरज पूर्ण करण्या साठी सुरवातीला सीमेंट कोंक्रीटचे

ड्रॅगन फ्रूट खत नियोजन


Post a Comment