पिकांच्या वाढीसाठी आवश्यक १६ अन्नद्रव्य


पिकांच्या वाढीसाठी जे जमिनीतील पोषक घटक उपयुक्त असतात त्यांना आपण अन्नद्रव्य असे म्हणतो.  कोणत्याही पिकांच्या चांगल्या वाढीसाठी साधारनंत: १६ अन्नद्रव्यांची गरज असते. ही १६ अन्नद्रव्ये तीन गटात विभागली जातात.

१ ) मुख्य अन्नद्रव्य :-

नत्र , स्फुरद , व पालाश ही मुख्य अन्नद्रव्य यांची पिकांना मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते जी पिकांना जमिनीतून व खता द्वारे मिळतात.

कार्बन , हायड्रोजन आणि ऑक्सीजन हे देखील घटक वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. जी हवा व पाण्यामार्फत त्यांना पुरवठा होतो , त्यांना  मिळतात.

२ ) दुय्यम अन्नद्रव्य :-

कॅल्शियम , मॅग्नेशियम , गंधक ही अन्नद्रव्य पिकांना मध्यम प्रमाणात लागतात . तीही जमिनीतूनच पिकांना पुरवली जातात.

३ ) सूक्ष्म अन्नद्रव्य :-

लोह , मंगल , तांबे , जस्त , मॉलीब्डेनम , बोरॉन , क्लोरिण या अन्नद्रव्यांची देखील पिकांना गरज असते, परंतु ही गरज अगदी कमी प्रमाणात असते. मात्र त्यांचा पूर्ण अभाव असल्यास पिकांची पूर्ण जोमाने वाढ होत नाही.



Post a Comment

Previous Post Next Post