Showing posts with label Marathi Post. Show all posts
Showing posts with label Marathi Post. Show all posts

किटकनाषकांचे लेबल व त्यांच्या क्लेमबाबत शेतकर्याचे अधिकार व सर्व माहिती

किटकनाषकांचे लेबल म्हणजे काय व त्यांच्या क्लेमबाबत सर्व माहिती

                   शेतकरी मित्रांनो  आपण आपल्या शेतामध्ये किटकणाषके , बुरशीनाषके किंवा तननाषके यांचा वापर करतो. याचा कधी कधी पिकावर चांगला परिणाम होत नाही मग बर्‍याचदा आपण दुकानदार किंवा त्या कंपनीला दोष देतो यामध्ये आपले जे नुकसान व्हायचे ते तर होते. म्हणूनच माझ्या शेतकरी बांधवांनी त्यांचे अधिकार व आपण कोणत्या प्रकारचे म्हणजेच शासनाने प्रमाणित केलेले किटकणाषके वापरत आहोत किंवा कुठल्या बोगस कंपनीच्या औषधाचा तर वापर करत नाहीतणा याबद्दल जागरूक होणे हि काळाची गरज आहे. म्हणून मित्रांनो जाणून घ्या 

   

शेतकरी मित्रांनो सर्व प्रथम खरेदी करतांना शासनाने ज्या कृषि सेवा केंद्रास अधिकृत किटकणाषके बियाणे व खते विक्रीसाठी परवाना दिलेला आहे अश्याच केंद्रातून खरेदी करावी व पक्के बिल घ्यावे. शासनाने अशा दुकानास गुणवत्ता नियंत्रण तसेच शेतकर्‍यांच्या सुविधे साठी अधिकृत किटकणाषके  बियाणे व खते विक्रीसाठी ( निविष्टा ) परवाना दिलेला असतो. व शासकीय अधिकारी वेळोवेळी दुकानातील किटकणाषके बियाणे व खते यांची गुणवत्ता म्हणजेच सॅम्पल ची वेळोवेळी तपासणी करत असतात. यामुळे शेतकरी बांधवांना चांगले उत्पादनेच मिळतात व फसवणूक होत नाही.

           लेबल क्लेम म्हणजे काय .. 

            शेतकरी मित्रांनो आपल्या देशामध्ये किटकणाषके या निविष्ठेची गुणवत्ता नियंत्रित करण्यासाठी किटकणाषक अधिनियम १९६८ व अधिनियम १९७१ राबविण्यात येतो. या कायद्यानुसार कोणत्याही कंपनीला किटकणाषकाचे  वेष्टणीकरण केल्याशिवाय त्यांच्या किटकणाशकांची शेतकर्‍यांना विक्री करता येत नाही. याच बरोबर वेष्टणीकरण केल्यानंतर त्यावर केंद्रीय किटकणाषक मंडळ व नोंदणी समिती यांनी मान्य करून दिलेल्या नोंदणी प्रमाणपत्रा सोबतच्या लेबलणूसारच लेबलची छपाई करावी लागते. तसेच वेष्टनामधील किटकणाशकांचे गुणधर्म लेबलवर छपाई केलेल्या मापदंडानुसारच  असणे हे या किटकणाषक कायद्याने बंधनकारक आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे कंपनीने लेबलवर छापलेल्या प्रमाणकानुसारच शतप्रतिशत क्रियाशील घटक वेष्टनामधे ( बाटली किंवा पाकीटा मध्ये असलेले औषध ) असणे म्हणजेच लेबलक्लेम.

          लेबलवर काय माहिती असते .. 

 1.  उत्पादनाचे तांत्रिक नाव, त्यामध्ये असणार्‍या क्रियाशील घटकाचे प्रमाण, त्याच्या फॉर्म्युलेशनचा प्रकार
 2. उत्पादनाचा बॅच नंबर, उत्पादन तयार झाल्याची तारीख, उत्पादनाची वापरासाठी अंतिम तारीख (expiry date)
 3. उत्पादकाचे (निर्माता) / आयतदार / विक्रेत्याचे नाव व संपूर्ण पत्ता
 4. विषबाधेची तीव्रता दर्शवणारा त्रिकोण तसेच वापारतांना किंवा वापरानंतर  लहान मुले व उत्पादन साठवणूकीबाबत सूचना
 5. रिकाम्या वेष्टनाची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीच्या सूचना (माहिती)
 6. सुरक्षित हाताळणी कशी करावी यासंबंधीच्या सूचना (माहिती)
 7. उत्पादनाची रासायनिक संरचना (घटक), त्याचे व्यापारी नाव .
 8. कोण कोणत्या पिकावर व कोणत्या किडी/रोगा साठी वापरासाठी चालते त्याची शिफारस.
 9. विषबाधा झाल्यास त्यावर  अॅंटिडोट्स व त्यावरील प्रथमोपचार इत्यादी बाबत महिती.
 10. विक्रीसाठी किरकोळ किंमत उत्पादनाचे वजन इत्यादी.
          ( लेबल  लहान असल्यास अनुक्रमांक आठमधील माहिती हि लीफलेट  किंवा माहितीपत्रिकेच्या स्वरुपात स्वतंत्रपणे छपाई करून उत्पादनासोबत ठेवलेली असते.)

       किटकणाषके खरेदी करत असतांना शेतकर्‍यांनी लेबल क्लेमबाबत काय पडताळणी करावी...
 1. सर्वप्रथम किटकणाषक खरेदी करत असतांना परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी.
 2. विक्रेत्याकडून खरेदीचे पक्के बिल घ्यावे. बिलावर खरेदीची तारीख , उत्पादनाचे व्यापारी नाव व तांत्रिक नाव , क्रियाशील घटकाचे प्रमाण, फॉर्म्युलेशनचा प्रकार, उत्पादनाचा बॅच नंबर, उत्पादन तयार झाल्याची तारीख, उत्पादनाची वापरासाठी अंतिम तारीख (expiry date), त्याचे वजन, किंमत इत्यादी माहिती लिहिलेली असावी. लिहिलेली माहिती अचूक आहेका तसेच बिलावर विक्रेत्याची सही असल्याची खात्री करावी
 3. शेतकर्‍याला किटकणाषके ज्या कारणासाठी वापरायचे आहे. त्यासाठी संबंधित किटकणाषकाची शिफारस केलेली असल्याची लेबल लिफलेटवरुण तपासनी करून नंतर किटकणाषके खरेदी करावे.
 4. लेबल लिफलेटवरील पिकांच्या शिफारशीबाबतच्या माहितीची सत्यता तपासून पहायची असल्यास केंद्रीय किटकणाषक मंडळ व नोंदणी समितीच्या  https://www.cibrc.gov.in  किंवा येथे 👉 CLIK या संकेत स्थळावर संबंधित किटकणाषकाला लेबल क्लेमची सदरील पिकासाठी शिफारस केलेली आहे किंवा नाही याबाबत खात्री करता येते.
 5. खराब झालेले किंवा मुदतबाह्य (expiry) झालेले तसेच सीलबंद नसलेले किटकणाषक खरेदी करू नये.
 6. खरेदी करतांना किटकणाषकासोबत लेबल लीफलेट असल्याबाबत खात्री करून नंतरच किटकणाषकाची खरेदी करावी.
          किटकणाषकांच्या लेबल क्लेमनुसार ग्राहकाचे  अधिकार व सुरक्षितता याबद्दल थोडक्यात
 1. पॅकिंग केलेल्या किटकणाषकाच्या पॅकवरील लिहीलेल्या लेबलणूसारच बाटली किंवा पाकीटातील किटकणाषकाचा क्रियाशील घटक त्यामध्ये असल्याची खात्री उत्पादकाणे लेबल क्लेमनुसार दिलेली असते.
 2. पॅकिंग करण्यापूर्वी किटकणाषक उत्पादकाने सदर किटकणाषकाच्या उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत स्वतःच्या  प्रयोगशाळेत प्रत्येक बॅचची तपासणी करून घटकाच्या मात्रेची खात्री केलेली असते.
 3. केंद्रीय किटकणाषक मंडळ व नोंदणी समितीने संबंधित कंपनीकडून तयार केलेल्या उत्पादनाची (औषधीमधील विषाचे प्रमाण किंवा तीव्रता ) विषकारकता, पिकानुसार पिकावरील कीड व रोग यांच्या नियंत्रणाबाबत त्याची परिणामकारकता. तसेच कामगार, ग्राहक व पर्यावरणासाठीची सुरक्षितता,  उत्पादनाचे रसायनशास्त्र इत्यादि गोष्टींचा विस्तृत व अभ्यासपूर्वक ( माहिती घेवून) आकडेवारी घेऊन त्याची तपासणी करून खात्री केलेली असते.
 4. कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र देताना मानवी आरोग्य व पर्यावरणाची सुरक्षितता या गोष्टींना पहिले प्राधान्य दिलेले असते. त्यामुळे नोंदणी प्रमाणपत्रानुसार लेबल क्लेम सादर केलेल्या कंपनीचे उत्पादन सर्वथा सुरक्षित असते. 
 5. कंपनीच्या नोंदणी प्रमाणपत्रासोबत वेष्टणीकरणानंतर त्यावर छपाई करून त्यावर प्रदर्शित करावयाचे लेबल व लीफलेटचा मसुदा अंतिम करून दिलेला असतो. त्यामुळे नोंदणी समितीच्या परवानगीशिवाय कोणत्याही कंपनीला त्यामाध्ये बदल करता येत नाही. 
 6.  ग्राहकांच्या सोईसाठी लेबल व माहीतीपत्रक इंग्रजी, हिंदी या भाषांसोबत मराठी भाषेतही छापणे उत्पादकास (कंपनीस) बंधनकारक आहे.

तक्रार कोठी करावी? 

किटकणाषकाच्या पिकावरील परिणामकारकतेबाबत काही तक्रार असल्यास अशी लेखी तक्रार संबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांच्याकडे दाखल करता येते. तक्रार दाखल करताना संबंधित उत्पादनाचे वेष्टन, लेबल, माहितीपत्र, खरेदीपावती इत्यादि बाबी तालुका कृषि अधिकारी यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी यांचे अधिनस्त शासनाने तालुका तक्रार निवारण समिति गठित केलेली असून सदर समितीमध्ये विक्रेता, कृषि विद्यापीठ, महाबीज, कृषि विज्ञान केंद्र यांचे प्रतीनिधी सदस्य म्हणून असतात. सदर समिति आठ दिवसांमध्ये संबंधित शेतकर्‍याच्या शेताला भेट देऊन आपला अहवाल उपलब्ध करून देते. सदर अहवाल ग्राहक न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतो. खालील प्रकारच्या तक्रारींसाठी नजदिकच्या तालुका कृषि अधिकारी/  जिल्हा/  उपविभाग/  संभाग, कृषि कार्यालयाशी किंवा किटकणाषक गुणवत्ता निरीक्षण यांच्याशी संपर्क साधावा. 

 1. लेबल किंवा माहितीपत्रकावर खाडाखोड झालेली आढळली. 
 2.  लेबल व लीफलेट सुस्पष्ट व वाचनीय नाहीत म्हणजे वाचता येत नाही.
 3. इंग्रजी व हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेत लीफलेट वर छपाई केली नाही. 
 4. उत्पादकाने संबंधित किटकणाषक जास्तीच्या पिकासाठी शिफारस केली असल्याचे लीफलेटवर माहिती नमूद केलेली असल्याचा संशय असल्यास.
 5. उत्पादनाच्या लेबलवर उत्पादनाच्या स्थळाचा उल्लेख केलेला नाही असे दिसून आल्यास. 

आशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित उत्पादकांवर किटकणाषक अधिनियम १९६८ व नियम १९७१ मधील तरतुदींनुसार कारवाई करता येते. 

हरभरा लागवड | हरभरा उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या बाबी | हरभरा सुधारित वान | हरभरा पिकातील कीड व रोग | हरभरा लागवडी साठी जमीन | काबुली हरभर्‍याच्या सुधारित जाती

हरभरा पिकाबद्दल थोडक्यात

                           हरभरा हे रब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या पिकांपैकी एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. तसेच मानवी आहारात हरभर्‍याचे खूप महत्व आहे. नवीन सुधारित वानांचा विचार केला असता प्रगतिशील शेतकर्‍यांच्या शेतामधील सुधारित वनांचे उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत गेल्याचा अनुभव आहे. या पिकाचे उत्पादन कमी होण्यामागे कारण हरभर्‍यावरील घाटेअळी तसेच विविध कीड व रोग हे आहे. याच बरोबर लागवडीसाठी चुकीच्या वाणाची निवड तसेच कीड व रोगाचे चुकीचे नियोजन हे देखील उत्पादनावर परिणाम करते. हरभर्‍यावरील घाटेअळी ही ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान करते. 

उत्पादन वाढीसाठी खालील बाबींचा वापर करावा

१ ) पेरणीसाठी योग्य जमिनीची निवड करावी व पूर्वमशागत करून घ्यावी.

२ ) वेळेवर पेरणी करावी तसेच पेरणीचे योग्य अंतर ठेवावे.

३ ) पेरणी करतांना बिजप्रक्रिया करावी तसेच जिवाणू संवर्धंनाचा वापर करावा.

४ ) पेरणीसाठी अधिक उत्पादन देणार्‍य तसेच रोग प्रतीकारक्षम व सुधारित वानाची निवड करावी.

५ ) रोग व किडींचे योग्य नियोजन करावे तसेच तननियंत्रण करावे.

६ ) खत आणि पाण्याचे देखील योग्य नियोजन करावे.

हरभरा लागवडी साठी जमीन

                            हरभरा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी मध्यम ते भारी काळी कसदार, भुसभुशीत तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. ज्या भागामद्धे वार्षिक चांगले पर्जन्यमान होते अश्या भागामद्धे मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात ओलावा चांगला टिकून राहतो अश्या भागामद्धे जिरायत हरभर्‍याचे चांगले पीक येते. ज्या ठिकाणी सिंचन व्यवस्था असेल अश्या ठिकाणी उथळ तसेच मध्य जमिनीत देखील हरभर्‍याचे पीक घेता येते. हरभरा पिकाच्या लागवडी साठी हलकी चोपण किंवा पाणथळ व क्षारयूक्त जमिनीची निवड करूनये.

हरभर्‍याच्या सुधारित जाती व त्यांचे वैशीष्टे ( वान )

१ ) फुले विक्रम

                            फुले विक्रम या वनाच्या दाण्याचा आकार पिवळसर मध्यम असून हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानाच्या झाडाची ऊंची ५५ ते ६० सेंमी असून घाटे हे जमिनीपासून १ फुटावर लागतात. हा वान जिरात, बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. याच बरोबर अधिक उत्पन्न देखील देणारा हा वान आहे. या वाणापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १६ ते १७ क्विंटल प्रती हेक्टरी, बागायत क्षेत्रात २२ ते २३ प्रती हेक्टरी तर उशिरा पेर केल्यास २१ ते २२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते. हा वान साधारण २ फुटापर्यंत वाढत असल्यामुळे हार्वेस्टर्णे काढणी करण्यास योग्य आहे. त्यामुळे काढणी खर्च तसेच काढणी करतांना होणारे नुकसान हे देखील होत नाही. ( महात्मा फुले कृषि विद्यापीठाने हार्वेस्टर्णे काढणी करता येईल अश्या फुले विक्रम या हरभर्‍याच्या सुधारीत वानाची निर्मिती केली आहे. )

२ ) दिग्विजय

                             दिग्विजय हा वान पिवळसर तांबूस रंगाचा असून या वाणाचे दाणे टपोरे असतात. हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानाच्या झाडाची ऊंची मध्यम असून वाढीचा कल निमपसरट व पाने , घाटे आकाराने मोठे तसेच गर्द हिरवे असतात. हा वान जिरात, बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण जिरायत क्षेत्रामद्धे ९० ते ९५ दिवस तर बागायत क्षेत्रात साधारण ११० ते ११५ दिवस ईतकी आहे. या वाणापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १५ ते १६ क्विंटल प्रती हेक्टरी, बागायत क्षेत्रात ३५ ते ४० क्विंटल प्रती हेक्टरी तर उशिरा पेर केल्यास १८ ते २२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.

३ ) विजय

                             विजय हा वान मर रोगास प्रतिकारक्षम असून अधिक उत्पादनक्षम आहे.  या वाणाची पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता ही ईतर वानांन पेक्षा जास्त आहे. हा वान जिरात, बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. हा वान बुटका तसेच पसरट असून पाने, घाटे व दाणे आकाराने मध्यम आहे. या वाणाची पक्वता साधारण जिरायत क्षेत्रामद्धे ८५ ते ९० दिवस तर बागायत क्षेत्रात साधारण १०५ ते ११० दिवस ईतकी आहे. या वाणापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टरी, बागायत क्षेत्रात ३५ ते ४० क्विंटल प्रती हेक्टरी तर उशिरा पेर केल्यास १६ ते १८ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.

४ ) जाकी ९२१८

                            जाकी ९२१८ हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणाचे दाणे पिवळसर तांबूस तसेच आकाराने टपोरे असून हावान जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण १०५ ते ११० दिवस ईतकी आहे.  या वानापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १५ ते १६ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात २८ ते ३२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.

५ ) विशाल

                           विशाल हा वान मर रोगास प्रतिकारक्षम असून यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक आहे. या वानाचे दाणे आकर्षक पिवळ्या रंगाचे तसेच टपोरे असतात. हा वान अधिक उत्पादनक्षम असून या वानाला बाजारभाव देखील अधिक मिळतो. या वानाच्या झाडाची ऊंची मध्यम असून वाढीचा कल निमपसरट व पाने , घाटे आकाराने मोठे तसेच गर्द हिरवे असतात. हा वान जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण ११० ते ११५ दिवस ईतकी आहे. या वानापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात ३० ते ३५ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.

६ ) साकी ९५१६

                             साकी ९५१६ हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे असून हावान जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण १०५ ते ११० दिवस ईतकी आहे. या वानापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात ३० ते ३२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.

७ ) बी. डी. एन. जी. ७९७

                             बी. डी. एन. जी. ७९७ हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणाचे दाणे मध्यम टपोर्‍या आकाराचे असून हावान जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण १०५ ते ११० दिवस ईतकी आहे. या वानापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात २० ते २२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.

८ ) फुले जी - १२

                           फुले जी - १२ या वानाचा रंग आकर्षक पिवळसर तांबूस असून हा वाणा जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य आहे. या वानापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १२ ते १३ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात २८ ते ३० क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.

९ ) राजस 

                           राजस हा वान पिवळसर तांबूस रंगाचा असून या वाणाचे दाणे टपोरे असतात. हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. हा वान जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण १०० ते १०५ दिवस ईतकी आहे. या वाणापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टरी, बागायत क्षेत्रात ३५ ते ४० क्विंटल प्रती हेक्टरी तर उशिरा पेर केल्यास १८ ते २० क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.

१० ) आय सी सी सी ३७

                         आय सी सी सी ३७ हा लवकर येणारा तसेच मर रोगास प्रतिकारक्षम वान आहे. तसेच हावान घाटे अळीस सहनशील आहे. या वाणाची पक्वता साधारण ९० ते १०० दिवस ईतकी आहे. या वानापासून साधारण उत्पन्न १६ ते २० क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.

काबुली हरभर्‍याच्या सुधारित जाती व त्यांचे वैशीष्टे ( वान )

१ ) विराट

                        विराट हा वान मर रोगास प्रतिकारक्षम असून हा वान काबुली तसेच अधिक टपोर्‍या दाण्याचा असल्या मुळे यास अधिक बाजारभाव मिळतो. हा वाण जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य. या वाणाची पक्वता साधारण ११० ते ११५ दिवस ईतकी आहे. या वांनापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १० ते १२ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात ३० ते ३२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.

२ ) विहार

                       विहार हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. हा वान  देखील अधिक टपोर्‍या दाण्याचा असल्या मुळे यास चांगला बाजारभाव मिळतो. हा वाणा जिरायत तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य. या वाणाची पक्वता साधारण ११० ते ११५ दिवस ईतकी आहे. या वांनापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १० ते १२ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात ३० ते ३२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते. दक्षिण भारतात या वानाची पक्वता ९० ते ९५ दिवस ईतकी आहे.

३ ) काक २ ( पिकेव्हि काबुली - २ )

                        काक २ हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. हा वान  देखील अधिक टपोर्‍या दाण्याचा असल्या मुळे यास चांगला बाजारभाव मिळतो. या वाणाची पक्वता साधारण ११० ते ११५ दिवस ईतकी आहे. या वांनापासून साधारण उत्पन्न २६ ते २८ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके मिळू शकते.

४ ) कृपा

                        कृपा हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानाच्या दाण्याचा रंग सफेद पांढरा असल्यामुळे याला आकर्षक बाजार भाव मिळतो. तसेच दाणे अधिक टपोरे असतात. या वाणाची पक्वता साधारण १०५ ते ११० दिवस ईतकी आहे. या वानापासून साधारण उत्पन्न १६ ते १८ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके मिळू शकते.

बीजप्रक्रिया व जिवाणूसंवर्धन

                        बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी तसेच पिकावर रोप अवस्थेत येणार्‍या बुरशीजण्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी बिजप्रक्रिया करणे फार महत्वाची ठरते. पेरणीपूर्वी प्रतीकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेझिम एकत्र करून चोळावे. तसेच यानंतर १० ते १५ किलो बियाण्याला २५० ग्रॅम रायझोबियम या जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया गुळाच्या थंड द्रावणातून चोळून करावी. रायझोबियम या जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करण्यासाठी १ लीटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेवून तो वीरघळे पर्यंत पाणी कोमट करावे. नंतर बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी.

हरभरा खत नियोजन

                           हरभर्‍याच्या सुधारित जाती ( वान ) खत व पाणी यास चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे यांना खताची योग्य मात्र देणे खूप गरजेचे ठरते. शेवटची कुळवणी करत असतांना हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतामद्धे पसरावे. त्यामुळे खत जमिनीत चांगले मिसळले जाते. शेतामद्धे जर खरीप हंगामात शेणखत वापरले असेल तर रब्बी हंगामात हरभर्‍यास शेणखत देण्याची गरज नाही. पिकाची पेरणी करतांना प्रती हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद वापरावे. म्हणजे १२५ किलो डी.ए.पी. (१८:४६:००) किंवा ५० किलो युरिया व ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रती हेक्टरी द्यावे. याच बरोबर हेक्टरी ५० किलो पालाश दिले असता पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सुधारित वानांचा विचार केला असता अधिक उत्पन्नासाठी जमिनीचे मातिपरीक्षण करून खत नियोजन केल्यास नक्कीच उत्पन्नात वाढ होते. पीक फुलोर्‍यात असतांना २ टक्के यूरियाची फवारणी करावी त्यानंतर १० ते १५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी. यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होते.

हरभरा पिकातील कीड व रोग

                         हरभरा पिकावर प्रामुख्याने घाटेअळी चा प्रादुर्भाव आढळतो. ज्यामुळे उत्पन्नात बरीच घट होते. या किडीबरोबर मर रोग, कोरडी मुळकुज, ओली मुळकुज, खुजा रोग, तसेच मान कुजव्या या रोगांचा देखील प्रादुर्भाव आढळतो. 

हरभरा पिकातील कीड

हरभर्‍या वरील घाटेअळी

हरभर्‍या वरील घाटेअळी

                        हरभर्‍या वर घाटेअळी सुरवातीला पानावर तसेच कोवळ्या कळ्यांवर व नंतर घाट्यावर उपजीविका करते. घाटेअळी ही घाट्याला छिद्र पडून डोके आत घालते व आतील दाणे खाते. घाटेअळीच्या शरीराचा अर्धा भाग घाट्यात असतो व अर्धा भाग बाहेर असतो. या अळीमुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते.

फवारणी / उपाय

                          पीक लहान असतांना या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. याच बरोबर शेतामद्धे ८ ते १० फेरोमोन ( कामगंध ) सापळे लावावेत. तसेच यामध्ये अडकलेल्या पतंगाचा नाश करावा, यामुळे पुढील प्रजननास आळा बसतो. यानंतर  प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के २० मी.ली  किंवा क्लोरोपारीफॉस १५ मी.ली. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रिन ८ ते १० मी.ली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. या व्यतिरिक्त जास्त प्रादुर्भाव दिसल्यास इमामेक्टिन बेन्झोएट ४ ते ५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

मर रोग

                           हा रोग कोवळ्या रोपांवर फुजॅरियम ऑक्झिस्पोरम या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रोपाच्या किंवा झाडाच्या खोडांचा भाग गर्द रंगहीन होतो. अश्या रोपांच्या खोडाचा उभा छेद घेवून पहिले असता मध्य पेशी गर्द तपकिरी किंवा काळ्या पडलेल्या दिसून येतात. रोपांच्या पानांचा रंग हिरवा राहून रोपे मारतात. प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या फक्त फांद्या सुकलेल्या दिसतात.

फवारणी / उपाय

                           या रोगाच्या नियंत्रणासाठी मर रोग प्रतीकारक्षम जातीची निवड करावी. हा रोग आढळून येताच बुरशी नाशकाची फवारनि करावी.

कोरडी मुळकुज

                            हा रोग रायझोक्टोनिया बटाटीकोला या बुरशीमुळे होतो. हरभर्‍या मध्ये फुलोरा अवस्था व घाटे लागण्याच्या वेळी होणारी कोरडी मुळकुज हा महत्वाचा रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झालेली झाडे सुकून चिपाडाच्या रंगाचे होतात. याच बरोबर मुळे ठिसुळ बनतात व त्यांना तंतुमुळे खूप कमी असतात. 

ओली मुळकुज

                           ओली मुळकुज या रोगाची लागण झाल्यास रोपे पिवळी पडून वळतात, मरतात. हा रोग जमिनीत अधिक ओलावा असल्यास जास्त प्रमाणात दिसून येतो. या रोगामद्धे खोड व मुळे कुजून जातात आणि त्यावर गुलाबी बुरशीची वाढ झालेली दिसून येते.

फवारणी / उपाय

                           या रोगांच्या नियंत्रनासाठी रोग प्रतीकारक्षम जातीची निवड करावी. तसेच प्रमाणात गरजे नुसार पाणी द्यावे याच बरोबर शेतामद्धे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. उत्तम निचरा होणार्‍या जमिनीची लागवडीसाठी निवड करावी. लागवड करतांना बिजप्रक्रिया करावी.

मान कुजव्या

                           हा रोग स्क्लेरोसीयम रोलाफिसाय या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव पेरणीच्या वेळी जमिनीत जास्त ओलावा व उष्ण तापमान असल्यास होतो. या बुरशीची लागण झालेल्या रोपांच्या खोडाचा भाग बारीक होऊन कुजतो. त्यावर पांढरे पट्टे किंवा बुरशीच्या पेशींची वाढ झालेली दिसते, त्यावर नंतर मोहरीच्या आकाराच्या गोल बुरशीच्या गाठी दिसतात.

खुजा रोग

                           हा रोग विषाणूमुळे होतो तसेच या रोगाचा प्रादुर्भाव भारताच्या विविध भागात आढळून येतो. या रोगाचा प्रसार मावा व नाकतोड्यामार्फत होतो. या रोगामुळे झाडाची वाढ थांबुन पेरकांडे लहान पडतात. पाने लहान होवून पिवळी नारंगी किंवा तपकिरी होतात. निरोगी झाडापेक्षा प्रादुर्भाव ग्रस्त झाडांची पाने कडक, कठीण असतात तसेच खोडातील तंतुपेशी तपकिरी रंगाच्या पडतात.

फवारणी / उपाय

                           या रोगांच्या नियंत्रनासाठी रोग प्रतीकारक्षम जातीची निवड करावी. तसेच या रोगाचा प्रसार मावा व नाकतोड्यामार्फत होत असल्या मुळे या किडींचा वेळीच बंदोबस्त करावा.

तुषार सिंचन हरभरा पिकास वरदान

                            हरभरा पिकाची लागवड करत असतांना सुधारित वाणाची निवड केल्यास व तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्यामुळे या पिकास गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास पीक उधळते यामुळे उत्पादनात मोठी घट होते. तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास आवश्यक त्यावेळी तसेच पाहिजे त्या प्रमाणात पाणी देता येते. याच बरोबर जास्त पाण्याचे प्रमाण झाल्यास होणार्‍या मुळकुज या रोगापासून होणारे नुकसानदेखील टळते. पाण्याचे योग्य नियोजन तसेच पाण्याची बचत देखील होते.

तूर लागवड | तूर लागवडी साठी जमीन | तुरीच्या सुधारीत जाती ( वान ) | तूर पेरणी कधी करावी | तूर बीज प्रक्रिया | तूर खत नियोजन | तुरीवरील किड व रोग

तूर लागवड | तूर लागवडी साठी जमीन | तुरीच्या सुधारीत जाती ( वान ) | तूर पेरणी कधी करावी | तूर बीज प्रक्रिया | तूर खत नियोजन | तुरीवरील किड व रोग

तुरी बद्दल थोडक्यात

                     शेतकरी बांधवांनो भारता मध्ये  तुरीची शेती करणार्‍या राज्यामध्ये अग्रगन्य राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. तूर हे राज्यातील सर्वात प्रमुख डाळवर्गीय पीक असून याची लागवड सर्व भागामद्धे खरीप हंगामात अंतरपिक म्हणून बाजरी, कापूस, ज्वारी तसेच सोयाबीन या प्रमुख पिकांबरोबर केली जाते. तूर हेपिक डाळवर्गी असल्यामुळे यापिकाच्या मुळावरील असणार्‍या गाठीतील रायझोबियम या जिवाणूमुळे हवेतील नत्राचे फार मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होते. तसेच नत्रयूक्त रसायनिक खताची बचत देखील होते. तुरीच्या पिकाचे उत्पादन कमी होण्यामागील कारणांमध्ये मर रोग व शेंगा पोखरणार्‍या आळीचा प्रादुर्भाव तसेच पिकाला फुले व शेंगा लागण्याच्या काळात पाण्याची कमतरता. यामुळे तुरीच्या उत्पन्नात फार मोठी घट होते. याच बरोबर लागवडीसाठी चुकीच्या वाणांची निवड तसेच कीड व रोगांबद्दल अपुरी माहिती या कारणांमुळे देखील उत्पन्नत घट होते.

तूर लागवडी साठी जमीन

                       तूर पिकाच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी तसेच मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. या पिकाची मुळे खोलवर जात असल्यामुळे भारी जमिनीत तुरीचे जास्त उत्पादन मिळते. लागवडी साठी जमीनीची निवड करत असतांना माती परीक्षण केलेले कधीही योग्य. कारण निवडलेल्या जमिनी मध्ये स्फुरद, कॅल्शियम व मॅग्निज या खनिजांची कमतरता नसावी. जमीन भुसभुशीत करावी. खोल मशागत केल्यामुळे पिकाची मुळे खोलवर जातात व झाडांची वाढ चांगली होते. या मुळे झाडाची अन्नद्रव्य शोषण्याची ताकतदेखील वाढते. तुरीच्या लागवडीसाठी चोपन तसेच क्षारयुक्त जमीन मानवत नसल्या मुळे अश्या जमिनीची निवड करू नये.

तुरीच्या सुधारीत जाती ( वान )

मराठवाडा कृषि विद्या पीठाने विकसित केलेले सुधारित वान

१ ) बी. डी. एन -२

                          बी. डी. एन -२ हा वान १५५ ते १६५ दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग पांढरा असून हा वान हलक्या व पाण्याची सोय नसलेल्या ठिकाणी लागवडीसाठी निवडावा. या वानापासून प्रती हेक्टरी साधारण १४ ते १५  क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची तूर डाळीसाठी चांगली आहे.

२ ) बी. डी. एन ७०८ ( अमोल तूर )

                          बी. डी. एन ७०८ ( अमोल तूर ) हा वान १६० ते १६५ दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून हा वान देखील हलक्या मध्यम तसेच कोरडवाहु व संरक्षित पाणी देण्याची योग्य सोय नसलेल्या ठिकाणी लागवडीसाठी निवडावा. या वाणाची आणखीन विशेषता म्हणजे हा वान मर व वांझ या रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानापासून प्रती हेक्टरी साधारण १६ ते १८  क्विंटल उत्पादन मिळते.

३ ) बी. डी. एन ७११

                          बी. डी. एन ७११ हा वान १५० ते १६० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग पांढरा असून ज्या ठिकाणी वार्षिक कमी पावूस काळ असणार्‍या तसेच हलक्या मध्यम व कोरडवाहु तसेच संरक्षित पाणी देण्याची योग्य सोय नसलेल्या ठिकाणी लागवडीसाठी निवडावा. या वाणाची आणखीन विशेषता म्हणजे हा वान देखील मर व वांझ या रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानापासून प्रती हेक्टरी साधारण १५ ते २०  क्विंटल उत्पादन मिळते.

४ ) बी. डी. एन ७१६

                          बी. डी. एन ७१६ हा वान १६५ ते १७० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून शेंगा हिरव्या रंगाच्या असतात. या वनाची लागवड ज्या ठिकाणी दोन तीन पाणी देण्याची सोय असेल अश्या ठिकाणी करावी. हा वान मर आणि वांझ या रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानापासून प्रती हेक्टरी साधारण १८ ते २०  क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची तूर डाळीसाठी चांगली आहे.

५ ) बी. एस. एम. आर. ७३६

                         बी. एस. एम. आर. ७३६ हा वान १७० ते १८० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल व टपोरा असून हा वान शेंगा पोखरणार्‍या किडीस कमी बळी पडतो तसेच मर व वांझ या रोगास प्रतिकारक्षम देखील आहे. या वाणाची लागवड कोरडवाहु, बागाईत व खरीप , रब्बी या हंगामात करता येते. परंतु या वानाला कळी अवस्थेत म्हणजे फुलोर्‍याच्या आधी पावसाचा खंड पडल्यास पाणी देणे आवश्यक आहे. तसे नकेल्यास उत्पन्नात भारी घट येते. या वनाचे कोरडवाहु क्षेत्रात साधारण हेक्टरी १४ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. तर बागायत क्षेत्रात साधारण १८ ते २२ क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

६ ) बी. एस. एम. आर. ८५३ ( वैशाली तूर )

                           बी. एस. एम. आर. ८५३ हा वान वैशाली या नावाने देखील ओळखला जातो. हा वान १६० ते १७० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग पांढरा असून दाणे टपोरे असतात. हा वान हलक्या ते मध्यम जमिनीत तसेच बागायत व ओलीताखालील क्षेत्रात लागवडीस योग्य आहे. हा वान मर आणि वांझ या रोगास प्रतिकारक्षम आहे. या वनाचे कोरडवाहु क्षेत्रात साधारण हेक्टरी १५ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. तर बागायत क्षेत्रात साधारण १८ ते २० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

७ ) विपूला

                            विपूला हा वान १४५ ते १६० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून दाणे मध्यम आकाराचे असतात. या वाणाची लागवड सलग तसेच अंतरपिक पद्धतीत लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळते. हा वान मर आणि वांझ या रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणापासू साधारण २४ ते २६ क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

८ ) पी. के. व्ही. ( तारा तूर )

                            पी. के. व्ही. तारा हा वान १७० ते १८० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग तांबडा असून दाणे जाड असतात. या वाणापासू साधारण १९ ते २० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते. या वाणाची तूर डाळीसाठी चांगली आहे.

९ ) आय. सी. पी. एल ८७११९ ( आशा तूर )

                           आय. सी. पी. एल ८७११९ हा वान आशा या नावाने देखील ओळखला जातो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून दाणे टपोर्‍या आकाराचे असतात. या वाणाची लागवड विदर्भात जास्त प्रमाणात होते. हा वान उशिरा येतो याचा कालावधी १८० ते २०० दिवसामध्ये तयार होतो. हा वान मर आणि वांझ या रोगास प्रतिकारक्षम तसेच शेंग माशी व शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव या वनावर कमी प्रमाणात आहे. या वाणापासू साधारण १८ ते २० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

१० ) आय. सी. पी. एल ८७ 

                           आय. सी. पी. एल ८७ हा वान १२० ते १३० दिवसामध्ये तयार होतो. हा वान हळवा असून या वाणाची लागवड बागायती क्षेत्रावर दुबार लागवडीसाठी तसेच खोडव्यासाठी योग्य आहे. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून या वाणापासू साधारण १८ ते २० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

११ ) एकेटी ८८११

                            एकेटी ८८११ हा वान १४० ते १५० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून दाणे मध्यम आकाराचे असतात. या वाणापासू साधारण १५ ते १६ क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

१२ ) राजेश्वरी

                            राजेश्वरी हा वान लवकरतयार होतो. हा वान १३० ते १४० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असतो. या वनाची लागवड सलग पेरणी व अंतरपीक पद्धती मध्ये फार चांगले उत्पादन मिळवून देतो. या वाणापासू साधारण २८ ते ३० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

१३ ) आय. सी. पी. एल ८८६३ ( मारोती तूर )

                         आय. सी. पी. एल ८८६३ हा वान मारोती या नावाने ओळखला जातो. हा वान १६५ ते १७५ दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून दण्यांचा आकार मध्यम असतो. हा वान फ्युजेरियम  मर या रोगास प्रतिकारक्षम आहे. परंतु हा वान वांझ या रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडतो. ( हा वान लागवडीस योग्य नाही.)

महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस असलेले तसेच चांगले उत्पन्न देणारे वान

महाराष्ट्रात १) विपूला २) पी. के. व्ही. ( तारा तूर ) ३) आय. सी. पी. एल ८७११९ ( आशा तूर ) ४) आय. सी. पी. एल ८७ ५) एकेटी ८८११ ६) राजेश्वरी या वाणांची प्रामुख्याने शिफारस केली आहे.

पेरणी कधी करावी

                         समाधानकारक म्हणजे साधारण ८० ते १०० मि. मि. पाऊस झाल्यावर वापसा येताच तुरीची पेरणी करावी. तुरीच्या पेरणीला उशीर झाल्यास उत्पन्नात घट होते. यामुळे तुरीची पेरणी १५ जुलै पूर्वी संपवावी. पावसाचा अंदाज बघून धूळ पेरणी केल्या अधिक उत्पन्न मिळते. 

बीज प्रक्रिया

                        कोणत्याही पिकाच्या बियाण्यास बिजप्रक्रिया करून पेरणी केल्यास नंतर येणार्‍या रोगांच्या समस्या फार कमी होतात. तुरीवर येणार्‍या बुरशीजण्य रोगांच्या नियंत्रणासाठी पेरणी पूर्वी थायरम २ ग्रॅम किंवा बावीस्टीन २ ते ३ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळावे. याच बरोबर १० किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम चोळून व सावलीत वाळवून पेरणी केल्यास १५ ते २० टक्के उत्पादनात हमखास वाढ होते. तसेच पी.एस.बी. ( स्फुरद विरघळवीनारे जिवाणू ) २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाण्यास लावल्यास जमिनीतील स्फुरद पिकाला उपलब्ध होते व याचा पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो व १० टक्के उत्पन्न देखील वाढते.  रायझोबियम जिवाणू संवर्धकांचा वापर केल्यामुळे पिकाच्या मुळावरील कार्यक्षम गठींच्या संखेत वाढ होते. गठींच्या संखेत वाढ झाल्यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होवून पिकाला त्याचा फायदा होतो. तसेच नंतरच्या पिकाला देखील याचा फायदा होतो. ( टीप. जिवाणू संवर्धकांचा व रासायनिक बुरशी नाशकांचा वापर करायचा असल्यास रसायनिक बुरशी नाशके आधी वापरावे व नंतर शिफारशी प्रमाणे जिवाणू संवर्धकांचा वापर करावा. )

तूर खत नियोजन

                             तुरीचे सुधारित वान रसायनिक खतांना चांगला प्रतिसाद देत असल्या मुळे उत्पन्न वाढीसाठी खताचे योग्य नियोजन करणे व मात्र देणे गरजेचे असते. शेतामद्धे शेवटची कुळवणि करत असतांना ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा शेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत कुळवणी आधी शेतात पासरल्यास ते जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळले जाते. तुरीच्या पिकाची सुरवातीच्या काळात जोमदार वाढ होण्या साठी नत्राची गरज असते. यासाठी पेरणी करतांना २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद ( १२५ किलो डायअमोनियम फॉस्पेट ज्याला आपण डीएपी म्हणतो ) किंवा ५० किलो यूरिया व ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट याचा प्रती हेक्टरी वापर करावा. याच बरोबर ५० किलो पालश ( म्युरेट ऑफ पोटॅश ) चा वापर केल्यास पिकाची रोगप्रतीकारक क्षमता वाढते. कोरड वाहू पिकामद्धे पीक फुलावर येत असतांना फक्त २ टक्के यूरिया फवारणी केल्यास फायदा होतो.

तुरीवरील किड व रोग

                            तुरीवर सुरवातीला रसशोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. उदा. मावा, फुलकिडे, तुडतुडे व पाने गुंडाळणारी अळी या व्यतिरिक्त शेंग अळी, शेंगा पोखरणारी पिसारी पतंगाची अळी, शेंगा वरील माशी या किडींचा आणि मर, वांझपणा , खोड कुज, तुरिवरील करपा व कॅकर या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.

तुरिवरील किड

१ ) रसशोषण करणार्‍या किडी

                           तुरीवर सुरवातीला रसशोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव आढळतो यामध्ये मावा, फुलकिडे, तुडतुडे व पाने गुंडाळणारी अळी यांचा प्रादुर्भाव जाणवतो.

फवारणी / उपाय

                           रस शोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमेथोएट १० मि. ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन १० मि. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेंग पोखरणारी अळी ( घाटे अळी )

२ ) शेंग पोखरणारी अळी ( घाटे अळी )

                           शेंग पोखरणारी अळी सुरवातीला कोवळ्या कळ्या खाते नंतर अळी शेगांना छिद्र पाडते व शरीराचा एक तृतीयांश भाग शेंगात घुसवून आतील दाणे फस्त करते. शेंग पोखरणारी अळीचा पतंग फिकट तपकिरी रंगाचा असतो. व शेंग पोखरणारी अळी हिरवट, करडी, राखाडी, किंवा पोपटी रंगाची असते. या अळीच्या अंगावर समांतर लांबीच्या तुटक तुटक रेषा असतात. पूर्ण वाढ झालेली अळी साधारण २.५ ते ४.५ से. मी. लांबीची असते. ही अळी पीक फुलोर्‍यात असल्यापासून ते काढणी पर्यंत पिकाचे नुकसान करते.

फवारणी / उपाय

                          सुरवातीला या अळ्यांच्या बंदोबस्ता साठी तूर लागवड करत असतांना ज्वारी . सूर्यफूल यांचे काही बी मिसळून पेरणी करावी यापिकाच्या ताटावर पक्षी बसून अळ्या खातात. शेतामद्धे T आकाराचे पक्षी थांबे बांधावे. याव्यतिरिक्त शेंग पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस २० मि. ली. किंवा सायपरमेथ्रिन १५ मि. ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन १० मि. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पीक ५० टक्के फुलोर्‍यात असतांना किंवा अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५ ते ७ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रंनीलिप्रोल 3 मी.ली या कीटक नाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून दुसरी फवारनि १५ दिवसानंतर करावी.

३ ) शेंगा पोखरणारी पिसारी पतंगाची अळी

                          या पतंगाची अळी हिरवट तपकिरी रंगाची असून अंगावर लहान लहान केस असतात. या अळीचे शरीर मध्ये फुगिर असते व दोन्ही टोकाकडे निमुळते होत गेलेले असते. ही अळी कोवळ्या शेंगा पोखरते व आतील दाणे खाते त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.

फवारणी / उपाय

                          शेंगा तयार होण्याच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस २० मि. ली. किंवा सायपरमेथ्रिन १५ मि. ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन १० मि. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४ ) शेंगा वरील माशी

                        शेंगा वरील माशीची अळी शेंगामद्धे बियाण्यात प्रवेश करून त्यावर उपजीविका करते. एक अळी तिचा जीवनक्रम एकाच शेंगामध्ये पूर्ण करते. या अळीने खाल्लेल्या दाण्यावर बुरशी वाढते व ते सडून जातात अशे दाणे खाण्यास व पेरण्यास उपयोगी पडत नाही. व उत्पादनात घट होते.

फवारणी / उपाय

                      शेंगा तयार होण्याच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमेथोएट १० मी. ली. किंवा क्विनॉलफॉस २० मि. ली. किंवा सायपरमेथ्रिन १५ मि. ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन १० मि. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५ ते ७ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुरिवरील रोग

१ ) तुरीवरील मर रोग

                       हा रोग जमिनीत राहणार्‍या फूजॅरियम ऑक्झिस्पोरम युडम या नावाच्या बुरशीमुळे होतो. या बुरशीमुळे सुरवातीला झाडाची पाने पिवळी पडतात व नंतर फांद्या वाळून संपूर्ण झाड वाळते. फुले येण्या आधी जर या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या रोगामद्धे झाडाच्या मुळावर उभा छेद घेवून पाहिले असता आतील भाग तपकिरी काळ्या रंगाचा झालेला दिसून येतो.

फवारणी / उपाय

                     या रोगाचा प्रसार जमिनीतील रोगट झाडाच्या अवशेषा मधून पसरतो. या रोगाच्या बुरशीचे बीज रोगट झाडाच्या अवशेषावर ३ ते ४ वर्ष जीवंत राहतात. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट केल्यास उष्ण तापमानामुळे या बुरशीचे बीज नष्ट होतात. बियाण्यास लागवडी पूर्वी थायरम २ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम २ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. तसेच मर रोगाला प्रतिकारक सुधारित वाणाची लागवडीसाठी निवड करावी.

२ ) तुरीवरील वांझपणा ( स्टरिलिटी मोझेक )

                      हा रोग विषाणूजन्य असून तो कोळी (एरिओफिड माईट) या किडी मुळे होतो. या रोगाची लागण झालेल्या झाडाची पाने लहान राहतात. झाडाची वाढ खुंटते  झाडे लहान रहातात व फांद्यांची संख्या जास्त असते.  पानांचा रंग गर्द हिरवा , फिकट हिरवा किंवा पिवळसर दिसतो. या रोगाची लागण रोप अवस्थेत झाल्यास अश्या रोपांना फुले किंवा शेंगा लागत नाहीत.

फवारणी / उपाय

                       शेतात रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नष्ट करावीत. याच बरोबर डायमेथोएट १० मी. ली. किंवा प्रोफेनोफॉस ५ मी. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच या रोगाला प्रतिकारक अश्या वनाचीच लागवडीसाठी निवड करावी. जास्त प्रादुर्भाव असल्यास १० दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

३ ) खोड कुज

                       हा रोग जमिनीत आढळणार्‍या फायटोपथोरा ड्रेचसलेरी या नावाच्या बुरशीमुळे होतो. हा रोग जास्त दिवस रिमझिम पाऊस पडत राहिल्यास झपाट्याने पसरतो. या रोगामुळे झाडाचा वरचा भाग वाळून जातो. व रोग झालेल्या ठिकाणी झाडाचे खोड मोडते.

फवारणी / उपाय

                      सतत पाऊस असल्यास शेतामद्धे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पाण्याचा योग्य रीतीने निचरा करावा. रोगप्रतीकारक वाणाची लागवडीसाठी निवड करावी. बीज प्रक्रिया करूनच बियाण्याची लागवड करावी. तसेच तूर उगवून आल्यानंतर १५ दिवसांनी बुरशी नाशकाची १० दिवसाच्या अंतरणी २ फवारण्या कराव्या.

४ ) तुरिवरील करपा

                      हा रोग अल्टरनेरिया टेन्यसीमा या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावा मुळे झाडाच्या पानांवर ठिपके पडतात व पाने गळतात. तसेच तुरीच्या शेंगा व दाणे देखील काळपट पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाडाच्या खालच्या पानांवर जास्त दिसून येतो.

फवारणी / उपाय

                      या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कार्बेन्डेझिम १० ग्रॅम किंवा मॅनकोझेब २० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

५ ) कॅकर

                     हा रोग डिप्लोडिया कजानी या बुरशी मुळे होतो. तुरीवर या रोगाची लागण झाल्यावर झाडाचे खोड जमिनी जवळ जाड होते. व त्या भागाशेजारी दुय्यम मुळे फुटतात.

फवारणी / उपाय

                     या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच कार्बेन्डेझिम १० ग्रॅम किंवा मॅनकोझेब २० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

🙏🙏  ईतर पिकाची माहिती हवी असल्यास कमेंट करून जरूर सांगा  🙏🙏

कापसा वरील किड व रोग

 कापूस लागवड | कापूस लागवडीची योग्य वेळ | कापसा वरील किड व रोग | कापसाचे खत नियोजन | कापूस लागवडीसाठी वानांची निवड | कापसाचे भरघोस उत्पादन

                    🙏  शेतकरी बांधवांनो कापूस लगवडीपासूनच जर किड व रोगाचे योग्य नियोजन केले तर कापूस हे पीक नक्कीच आर्थिक फायदा करून देणारे पीक ठरू शकते. कापसाच्या कमी उत्पादना मागे बरीच कारने आहेत. त्यामध्ये किड व रोगामुळे होणारे नुकसान हे प्रमुख कारण आहे. कापसावर भारतामध्ये जवळपास १६२ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यापैकी महाराष्ट्रात जवळपास २५ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. शेतकरी बांधवांनो कापसाच्या उत्पन्नात घट होण्यामागील आणखीन एक कारण म्हणजे कीड व रोगा बद्दल माहिती नसणे व कीटकनाशकांच्या जास्त तसेच काही वेळा चुकीच्या फवारण्या करणे. यामुळे उत्पन्नात घट होतेच परंतु खर्च देखील वाढतो. यासाठी पिकाच्या वाढीच्या टप्यानुसार तसेच रोग व किडींच्या प्रादुर्भावा नुसार वेळीच कीटकनाशकांची फवारणी तसेच इ. पद्धतींचा म्हणजे जैविक पद्धतीचा वापर करून वेळीच कीड व रोग व्यवस्थापन केल्यास नक्कीच आर्थिक फायदा होईल.

कापूस ( पांढरे सोने )

कापूस लागवडीसाठी वानांची निवड

                         बागायती कापसाची लागवड करत असतांना सुधारित बीटी कापूस निवडावा तो निवडत असतांना प्रामुख्याने वाणाचे गुणधर्म म्हणजे पानावर जास्त लव असणारा व पाण्याचा तान सहन करू शकणारा तसेच उशिरा येणारा म्हणजे १६० दिवसांनपेक्षा जास्त कालावधी च्या वानाची निवड करावी पानावर जास्त लव असणार्‍या (पानावर असणारा केसासारखा भाग) वानाचा फायदा म्हणजे रस शोषण करणार्‍या किडींनचा कमी प्रादुर्भाव होतो. याच प्रकारे कोरडवाहु बीटी कापूस निवडत असतांना लवकर तयार होणार्‍या म्हणजे १६० दिवसांनपेक्षा कमी कलावधीत येणार्‍या वानाची निवड करावी. 

कापूस लागवडीसाठी जमीन व अंतर

                       कापसाची लागवड करत असतांना मध्यम ते भारी तसेच पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. अतिउथळ तसेच चीबडणारी जमीन निवडू नये. बागायती कापसाची लागवड ५ X १ फुट किंवा ६ X १ फुट अंतरावर करावी तसेच कोरडवाहू कापसाची लागवड ३ X २ फुट किंवा ४ X १.५ फुट अंतरावर करावी.

लागवडीची योग्य वेळ

                     कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बागायती कापसाची लागवड ही जून महिन्यात करावी. तसेच कोरडवाहू कापसाची लागवड ही जूनच्या दुसर्‍या - तिसर्‍या आठवड्यात करावी किंवा चांगला मुर पावूस झाल्यास लगेच लागवड करावी. मान्सून पेरणीपेक्षा धूळपेरणीमुळे १० ते १५ टक्के अधिक उत्पादन मिळते. यासाठी जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात तसेच पावसाचा अंदाज पाहून ७ ते १० दिवस आधी धूळपेरणी करावी यासाठी जास्त ढेकळे , जास्त तान असलेली तसेच भेगा पडलेली जमीन निवडू नये. याच बरोबर पावसाच्या लहरी पणामुळे पाण्याचे नियोजन करूनच धूळ पेरणी करावी. 

कापसाचे खत नियोजन

                    कोणत्याही पिकाचे खत नियोजन करत असतांना माती परीक्षण केल्यास अधिक फायदा होतो. बागायती कापसाची लागवड करत असतांना हेक्टरी १५० किलो नत्र ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश द्यावे वरील खतापैकी पेरणीच्या वेळी २० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्र द्यावी आणि उरलेल्या नत्रापैकी ४० टक्के नत्र हे एक महिन्याने व उरलेले ४० टक्के नत्र हे दोन महिन्याने पेरून द्यावे. याच बरोबर कपाशिला फुले लागण्याच्या वेळी पेरणी नंतर साधारण ६० दिवसांनच्या नंतर १० ते १५ दिवसांनी २ टक्के नत्र ( यूरीय ) किंवा डी. ए. पी   २०० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी केल्यास उत्पन्नात वाढ होते. याच बरोबर सुक्ष अन्नद्रव्याची कमतरता ओळखून त्यांची पूर्तता करावी. सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे कपाशीवरील लाल्याचे प्रमाण कमी होते. ( रासायनिक खताबरोबर सूक्ष्म मूलद्रव्य देवू नयेत. )

कापसावरील कीड व रोग

                  शेतकरी बांधवांनो कापसावर मावा, तुडतुडे , फुलकिडे , पांढरी माशी, ठिपक्याची बोंडअळी , हिरवी बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, पिठ्या ढेकूण या किडींचा प्रादुर्भाव आढळतो याच बरोबर दहिया ( ग्रेमिल्ड्यु ), अनुजीवि करपा, पानावरील ठिपके, मुळकुज व मर, कवडी इ. रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. या कीड व रोगांवरील उपाय सविस्तर जाणून घेवू.

कापसावरील कीड

मावा ( Aphid )
मावा ( Aphid )

१ ) कापसावरील मावा

                     कापसावर मावा या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपअवस्थेत तसेच शेवटच्या अवस्थेत आढळतो. प्रौढ मावा आकाराने लांबट असून ते रंगाने पिवळसर ते गडद हिरवे किंवा काळे तर पिले ही फिकट रंगाची असतात. यांची लंबी १ ते २ मी. मी. असते. मावा किडीचे प्रौढ तसेच पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने तसेच पिकाच्या कोवळ्या फांदीवर समूहाने राहून रस शोषण करतात. या किडीमुळे पाने आकसतात ज्याला आपण बोकडा असे म्हणतो. हिकिड रस शोषण करण्याबरोबरच शरीरातून साखरेच्या पाकासारखा गोड चिकट पदार्थ सोडतात. यामुळे पाने व झाड चिकट होते. कालांतराने या चिकट पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होऊन संपूर्ण झाड काळसर दिसू लागते. बुरशी मुळे पिकाची सूर्यप्रकाशात अन्नतयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परिणामी झाडांची वाढ खुंटते त्यामुळे उत्पन्नात देखील घाट होते. पिकाच्या शेवटच्या अवस्थेत जर माव्याचा प्रादुर्भाव झाला तर बोंडे उमलत नाहीत कापसाच्या प्रतिवरही परिणाम होतो.

फवारणी / उपाय

                      या किडीच्या नियंत्रणासाठी सुरवातीला  ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच मावा कीड आढळून आल्यास ऑसिफेट २० ग्रॅम किंवा डायमेथोएट १० मि.ली. किंवा मिथिलडिमेटॉन १० मी. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( लागवडी नंतर पीक ४ -५ पानावर असतांना लिंबोळी अर्काची १५ दिवसांच्या अंतराने दोन तीन फवारण्या केल्यास अळी व ईतर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. )

Leaf Hopper
तुडतुडे ( Leaf Hopper )

२ ) कापसावरील तुडतुडे ( Leaf Hopper )

                       तुडतुडे हे पाचरीच्या आकाराचे तसेच दोन ते चार मी.मी. लांबीचे असतात. त्यांचा रंग फिकट हिरवा असतो पिल्लांणा पंख नसतात आणि ते नेहमी तिरके चालतात. पिल्ले आणि प्रौढ तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूने राहून पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे अशी पाने निस्तेज पिवळी दिसतात तसेच पाने लाल - तांबडी भुरकट होवून कडा मुरगळतात ( टोपीच्या आकाराची ) परिणामी झाडाची नीट वाढ होत नाही. अशा झाडांना पात्या, फुले व बोंडे कमी प्रमाणात लागतात. तुडतूड्यांचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने पूर्ण वाळून जातात.

फवारणी / उपाय

               पिकावर तुडतूड्यांचा प्रादुर्भाव जांनवल्यास ईमिडाक्लोप्रिड ३ ते ४ मि.ली किंवा असिटामिप्रिड २ ते ३ ग्रॅम किंवा थायमीथोक्झाईम ५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ( शिफारशी प्रमाणे व किडींच्या प्रादुर्भावा नुसार कीटकणाशकांचे प्रमाण कमी जास्त होवू शकते सल्ला घेवूनच कीटकणाशके वापरावीत )

फुलकिडे ( Thrips )

३ ) कापसावरील फुलकिडे 

                      फुलकिडे हे आकाराने लहान असतात. या किडीची मादी साधारण ६० ते ७० अंडी घालते. अंड्यातून पिल्ले साधारण २ ते ५ दिवसात बाहेर येतात. या किडींची बाल अवस्था ही ४ ते ७ दिवसांची असते. प्रौढ फुलकिडे व पिल्ले पानामागील भाग तसेच बोंडे खरवडून त्यामधून निघणारा रसशोषून घेतात. त्यामुळे पानाच्या वरील बाजूला तपकिरी रंगाचे व खालच्या बाजूने पांढरट चट्टे दिसून येतात. नंतर पान निस्तेज होवून वाळते.

फवारणी / उपाय

                     पिकावर फूलकिडींचा  प्रादुर्भाव अढळून आल्यास ऑसिफेट १० ग्रॅम किंवा ईमिडाक्लोप्रिड ३ ते ४ मि.ली किंवा असिटामिप्रिड २ ते ३ ग्रॅम किंवा थायमीथोक्झाईम ५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

whaite flay in cotton
पांढरी माशी ( White Fly )

४ ) कापसावरील पांढरी माशी ( White Fly )

                     पांढरी माशी आकारणे लहान असते. पांढर्‍या माशीची एक माशी साधारणपने १५० अंडे घालते पांढर्‍या माशीचे पिल्ले साधारण ८ ते १० दिवसात बाहेर येतात. माशीचे पिल्ले तसेच प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने राहून रसशोषण करतात. अशीपाने कोमेजून जातात व प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने लालसर ठिसुळ होतात व वाळतात. याच बरोबर पांढर्‍या माशीचे पिल्ले माव्या प्रमाणेच शरीरातून गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतात व त्यावर नंतर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी झाड चिकट होवून झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा वाढ खुंटते.

फवारणी / उपाय

                    कापसावर पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ऑसिफेट २० ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस १० मी. लि. किंवा डायफेणथ्युरॉन ८ ग्रॅम किंवा थायमीथोक्झाईम ५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

बोंडअळी

५ ) कापसावरील ठिपक्याची बोंडअळी

                    कापसाच्या लागवडिंनंतर साधारण एक महिन्याने या आळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. ही अळी गर्द तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळे व बदामी ठिपके असतात त्याच बरोबर तिच्या अंगावर बारीक काटे देखील असतात. पूर्ण वाढ झालेल्या अळीची लांबी साधारण १९ मी. मी. असते. या अळिचा प्रादुर्भाव पिकाच्या प्रथम अवस्थेत आढळून येतो. प्रथम अवस्थेत अळी शेंडा पोखरते व आतील भाग खाते त्यामुळे शेंडे सुकतात व गळतात. कपाशीला पात्या लागल्यानंतर व पुढील काळात काळ्या, फुले तसेच हिरव्या बोंडांना छिद्रे पाडून आतील भाग खाते. अळीने खाल्लेले जे मोठे बोंडे झाडावर राहतात त्यामध्ये अळीची लाळ पडल्यामुळे अशी बोंडे पूर्ण पकण्याच्या अगोदरच फुटतात. त्यामुळे कापसाची प्रत खालावते.

फवारणी / उपाय

                     ठिपक्याच्या बोंडअळीचा प्रादुर्भाव अढळून आल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४ ते ५ मि. लि. किंवा स्पीनोसॅड २ ते ३ मि. लि. किंवा क्विनॉलफॉस २० मि. लि. किंवा प्रोफेनोफोस १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्या मिसळून फवारणी करावी

बोंडअळी

६ ) कापसावरील हिरवी बोंड अळी ( अमेरिकन )

                     या किडीचा प्रादुर्भाव अनेक पिकांवर आढळून येतो. हिरव्या बोंड अळीचा पतंग फिकट पिवळा बदामी रंगाचा असतो. त्याचे मागील पंख धुरकट रंगाचे असतात. या किडीच्या लहान अळ्या अंशतः पारदर्शी , पिवळसर व पांढर्‍या असतात आणि पूर्ण वाढ झालेली अळी हिरव्या रंगाची असते व कडेने दोन्ही बाजूला गर्द करड्या रेषा असतात. ही कीड सुरवातीला कोवळी पाने , काळ्या तसेच फुलांवर उपजीविका करते. तसेच बोंडे आल्यावर त्यांना छिद्रे पाडून आत डोके घालून बोंडाचा आतील भाग पोखरून खाते. त्यामुळे पात्या, लहान बोंडे , फुले व कळ्या गळून पडतात. अळीचा अर्धा भाग बोंडाच्या बाहेर असतो. एक अळी ३० ते ४० बोंडांना नुकसान पोहोचवते.

फवारणी / उपाय

                     हिरव्या बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४ ते ५ मि. लि. किंवा स्पीनोसॅड २ ते ३ मि. लि. किंवा क्विनॉलफॉस २० मि. लि. किंवा प्रोफेनोफोस १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्या मिसळून फवारणी करावी

शेंदरी बोंडआळी ( गुलाबी बोंडआळी )

७ ) कापसावरील शेंदरी बोंडआळी ( गुलाबी बोंडआळी )

                    कपाशीवर सर्वात जास्त शेंदरी बोंडआळी मुळे नुकसान होते. कपाशीवरील या किडीचा प्रादुर्भाव जुलै ते ऑक्टोंबर - नोव्हेंबर या कालावधी मध्ये अधिक असतो. या अळीचा पतंग छोटा तसेच गर्द बदामी रंगाचा असतो. त्याच्या पंखावर बारीक काळे ठिपके असतात. लहान अळि सुरवातीला फिकट हिरवी असते व नंतर पांढरी होवून तिसर्‍या अवस्थेत तिला गुलाबी शेंदरी रंग प्राप्त होतो. या किडीची अळि सुरवातीला पात्या, फुले व काळ्या यावर उपजीविका करते. अळि फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र करून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त पाती व बोंडे गळून पडतात. याच बरोबर फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. बोंडामधील अळि बियांना छिद्र करून सरकी खाते. त्यामुळे रुईची प्रत खराब होते तसेच सरकीतील तेलाचे प्रमाण देखील कमी होते. अळि बोंडामध्ये आत शिरल्यानंतर विष्ठेने छिद्र बंद करते आळी आत शिरल्यानंतर वरुण तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही.

फवारणी / उपाय

                           या अळीच्या चांगल्या नियंत्रणा साठी फेरोमोन ( कामगंध ) सापळ्यांचा वापर करावा. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४ ते ५ मि. लि. किंवा सायपरमेथ्रिन ३ ते ४ मी. लि. किंवा स्पीनोसॅड २ ते ३ मि. लि. किंवा क्विनॉलफॉस २० मि. लि. किंवा प्रोफेनोफोस १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्या मिसळून फवारणी करावी ( प्रादुर्भाव जास्त आढळल्यास अंतर प्रवाही कीटकणाषकाचा शिफारशी प्रमाणे फवारणी साठी वापर करावा. ) 

कापसावरील रोग


१ ) कापसावरील दहिया ( ग्रेमिल्ड्यु )

                           दहिया हा रोग रामुलेरिय एरिओला ( रॅम्युलारीय गॉसिपाय ) या बुरशीमुळे होतो. दहिया हा रोग अतिआद्रता तसेच ओलसर हवामान अश्या वातावरणात येतो. हारोग ज्यादातार नोन बीटी म्हणजेच देशी कापसाच्या वानावर आढळतो. हा रोग झाडाच्या सर्वात खलील पानांवर किंवा जमिनी लगतच्या पानांवर आढळून येतो. यामध्ये प्रथम पानांवर पांढर्‍या रंगाचे ठिपके किंवा पट्टे दिसतात. हा रोग खालच्या बाजूने वरच्या बाजूकडे पसरत जातो. या मध्ये पानांवर दही शिंपडल्यासारखे डाग दिसतात या डागाला झटकल्यास डागाखाली लाल डाग (धब्बे ) दिसतात. प्रादुर्भाव वाढत गेल्यास असे पान पुढे लाल होते व नंतर पूर्ण झाड लाल दिसू लागते.

फवारणी / उपाय

                           दहिया या रोगाच्या नियंत्रणा साठी पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा ट्रायडीमॉर्फ  ०.१ टक्के ८० टक्के प्रवाही या बुरशीनाशकाची फवारणी करावी. ( या व्यतिरिक्त प्रादुर्भाव कमी जास्त असल्यास शिफारशी प्रमाणे ईतर बुरशीनाशकांचा वापर करावा )

२ ) कापसावरील अणुजीवी  करपा

                            हा रोग झन्थोमोनास ऑक्सेनोपोडीस पॅंथोव्होरा मालव्हेसीरम या सूक्ष्म जिवाणू मुळे होतो. या रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूने कोणात्मक ठिपके दिसतात. रोगाच्या प्रादुर्भावानुसार पानाच्या प्रमुख तसेच उपशिरा काळ्या पडतात याच बरोबर फांद्यावर तांबड्या किंवा काळपट रंगाचे ठिपके दिसतात. बोंडावर सुद्ध अश्याच प्रकारचे डाग दिसून येयात यामुळे बोंडातील कापूस पिवळा पडतो. 

फवारणी / उपाय

                            या रोगाची लक्षणे आढळून येताच स्ट्रेप्टोसायक्लीन १०० पी.पी.एम. १ ग्रॅम + कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास किंवा गरज वाटल्यास १० ते १५ दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा फवारणी करावी. ( या व्यतिरिक्त प्रादुर्भाव कमी जास्त असल्यास शिफारशी प्रमाणे ईतर बुरशीनाशकांचा वापर करावा )

पानावरील ठिपके

३ )कापसाच्या पानावरील ठिपके

                             हा रोग अल्टरनेरीया मॅक्रोस्पोरा या बुरशीमुळे होतो. या रोगामद्धे सुरवातीच्या काळात पानांवर पिवळट तसेच भुरकट रंगाचे गोलाकार बारीक ठिपके दिसून येतात. असे ठिपके नंतर वाढून मोठे होतात. व त्यांचा मधील भाग राखाडी रंगाचा होतो. नंतर असा राखाडी रंगाचा भाग फाटतो किंवा गळून पडतो.

फवारणी / उपाय

                             या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ( या व्यतिरिक्त प्रादुर्भाव कमी जास्त असल्यास शिफारशी प्रमाणे ईतर बुरशीनाशकांचा वापर करावा )

४ ) मुळकुज व मार

                             मुळकुज हा रोग रायझोक्टोंनीय बटाटाकोला , सोलॅनि या बुरशीमुळे होतो. यामध्ये झाडाची पाने कोमेजतात व शेंडे माना टाकतात. झाडाची मुळे कुजतात व झाड उपटल्यास ते सहज उपटून येते. तसेच कापसावर मर हा रोग दोन प्रकारात आढळतो पहिल्या प्रकारात मर रोग फुजॅरियम ऑक्झीस्पोरम पॅथोव्हार व्हासइन्फोक्टम या बुरशीमुळे होतो. यारोगाचे प्रमुख लक्षणे म्हणजे सुरवातीला रोपाची पाने भुरकट किंवा पिवळसर दिसतात. पुढे चालून पाने गळून जातात. दुसर्‍या प्रकारात मररोग व्हर्टीसिलियम हिडली या बुरशीमुळे होतो. फुजॅरियमच्या मर रोगात झाडे वरच्या बाजूने खाली  वाळत येतात. तर याउलट व्हर्टीसिलियमच्या बाबतीत झाडे खालच्या बाजूने वर वाळत जातात.

फवारणी / उपाय

                     या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागवडी पूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी. प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून नष्ट करावीत. लागवडी साठी रोगप्रतिकारक जातींचीच निवड करावी. प्रादुर्भाव आढळून आल्यास बुरशींनाशकाची फवारणी करावी तसेच शिफारसी प्रमाणे झाडांना बुरशींनाशकाच्या द्रवणाची आळवनि करावी. 

५ ) कवडी

                      कवडी हारोग कोलेटोट्रिकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगामद्धे बोंडावर तेलकट चट्टे दिसतात तसेच बोंडातील कापूस सरकीला घट्ट चिकटतो. तसेच बोंडे अर्धवट उमलतात.

फवारणी / उपाय

                 या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( या व्यतिरिक्त प्रादुर्भाव कमी जास्त असल्यास शिफारशी प्रमाणे ईतर बुरशीनाशकांचा वापर करावा )

🙏🙏 शेतकरी बांधवांनो रस शोषण करणार्‍या किडींच्या तसेच नुकसान करणार्‍या अळ्यांच्या चांगल्या नियंत्रणा साठी पिवळे व निळे चिकट ट्रॅप तसेच अळ्या साठी फेरोमन (कामगंध) ट्रॅप (सापळे) वापरल्यास फवारणी खर्च व काही फवारण्या कमी होण्यास नक्कीच मदत व्होईल. 🙏🙏


कांदा लागवड

 कांदा लागवड

सुधारित पद्धतीने कांदा लागवड, खरीप कांदा लागवड, रब्बी कांदा लागवड 

                     शेतकरी बांधवांनो कांदा लागवडी खालील क्षेत्राच्या बाबतीत भारत हा प्रथम क्रमांकावर आणि उत्पादनाच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारत हा कांदा उत्पादनात कमी असण्या मागच्या बर्‍याचश्या करणांमध्ये या पिकावर पडणार्‍या अनेक किडी व रोगांचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण आहे. रोपे लागवडीपासून ते कांदा साठवणुकीपर्यंत वेगवेगळ्या रोगांची झळ या पिकाला सहन करावी लागते. या अडचणींमुळे उत्पादनाचा दर्जा खलावतो परिनामी उत्पादन कमी मिळते. या पिकावरील कीड व रोगांचे अपुरे ज्ञान तसेच रोग नियंत्रणात आणण्यासाठी झालेला जास्तीचा खर्च यामुळे देखील कांदा शेती तोट्यात जाते. त्यामुळे कीड व रोगांची माहिती असणे आवश्यक असते. रोगाची लक्षणे दिसताच उपाययोजना करून रोग व कीड आर्थिक नुकसानी होण्या आधी आटोक्यात आणता येते. व उत्पन्नात वाढ होते. 

कांदा लागवडीचे हंगाम 

                कांदा लागवड ही साधारणतः खरीप हंगामामध्ये जुलै व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तसेच रांगडा ऑक्टोंबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि रब्बी डिसेंबर व जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात या तीनही हंगामात केली जाते.

कांदा लागवडीसाठी जमीन

                कांदा पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची निवड करत असतांना मध्यम हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. याच बरोबर एकाच क्षेत्रावर सतत कांदा पिकाची लागवड करू नये. यासाठी योग्य पिकांची फेरपालट करून उत्पादन घ्यावे. यामागील कारण म्हणजे बर्‍याचश्या बुरशीजन्य रोगांचे रोग पसरविनारे जंतु हे जमिनीत वास्तव्य करतात. या जंतूंच्या नियंत्रणासाठी उन्हाळ्यामध्ये ( एप्रिल ते मे ) जमिनीची नांगरणी करीत असतांना एक फुटा पर्यन्त खोलवर करून घ्यावी व जमीन चांगली तापू द्यावी यानंतर कुळवाच्या सहाय्याने दोन तीन पाळया देऊन मोठी ढेकळे फोडून जमिन भुसभुशीत करावी. शेतामधील पूर्वीच्या पिकाचे अवशेष तसेच तणे गोळा करून नष्ट करावीत. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तसेच सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढण्यासाठी शेतामध्ये शेणखत तसेच ट्रायकोडर्माचा वापर करावा. यामध्ये वापर करत असतांना प्रती हेक्टरी ५ ते १० किलो ट्रायकोडर्मा  याबरोबर १०० ते २०० किलो चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावेत 

बियाण्याची निवड व बिजप्रक्रिया

                   कांदा पिकाची लागवड करत असतांना चांगली उगवण क्षमता असलेल्या तसेच सुधारित व रोगप्रतिकारक जातींचा हंगामानुसार वापर करावा. बियाणे खात्री करूनच खरेदी करावे. पेरणी करण्यापूर्वी प्रती किलो बीयाण्यास २ ते ३ ग्रॅम कार्बेन्डेझीम किंवा थायरम किंवा कॅप्टन किंवा बावीस्टीन याची बिजप्रक्रिया करावी. तसेच रोप तयार झाल्यावर रोपांची शेतामध्ये लागवड करत असतांना कार्बेन्डेझीम किंवा बावीस्टीन १० ग्रॅम १० लीटर पाण्याचे द्रावण तयार करून त्यामध्ये मुळया बुडवून रोपांची लागवड करावी. बिजप्रक्रिया व बुरशी नाशकाच्या द्रावनामध्ये मुळया बुडवून लावल्यास मुळकुज व रोपांची मर रोखली जाते. व रोगमुक्त रोपांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत होते. 

खत व्यवस्थापन 

                   अनेक पिकांमध्ये चुकीच्या खतांचा वापर केल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे कांद्याच्या पिकासाठी हंगामानुसार शिफारस केलेल्या खतांची मात्रा वापरावी यामध्ये खरीपातील लागवडीसाठी हेक्टरी नत्र १०० किलो, स्फुरद ५० किलो,पालाश ५० किलो तसेच गंधक ५० किलो त्याचप्रकारे रांगडा यासाठि हेक्टरी नत्र १५० किलो, स्फुरद ५० किलो, पालाश ५० किलो तसेच गंधक ५० किलो व रब्बी साठी हेक्टरी नत्र १५० किलो, स्फुरद ५० किलो,पालाश ८० किलो व गंधक ५० किलो याप्रमाणात वापरावे. वरील खतांची मात्रा वापरत असतांना ५० टक्के नत्र १०० टक्के स्फुरद , १०० टक्के पालाश व १०० टके गंधक लागवडीपूर्वी ( लागवड करतांना ) वापरावे. कांद्याची लागवड केल्यानंतर या पिकाला २ महिन्यापर्यंत नत्राची आवश्यकता असते. म्हणून उरलेले  ५० टक्के नत्र २ ते ३ हप्त्यांमध्ये विभागून पाणी देण्याच्या अगोदर पिकाला द्यावे. नत्राचा वापर कांदा लागवडीनंतर ६० दिवसांच्या आतच द्यावा. ६० दिवसांच्या नंतर नत्राचा किंवा नत्रयुक्त खताचा वापर करू नये. वापर केल्यास जोड कांदे येणे, साठवणुकीत कांदा सडणे याच बरोबर बुरशीजन्य रोग म्हणजेच करपा इ. रोगांचा प्रादुर्भाव होतो. 

कांद्या मध्ये इतर खतांची आवश्यकता व कार्य 

१ ) स्फुरद , पालाश व गंधक

                   स्फुरद हे पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी आवश्यक असते. त्याचप्रकारे पालाशमुळे पिकाच्या पेशींना काटकपणा येतो. व कांद्याचा टिकाऊपणा वाढतो, आकर्षक रंग येतो. याच बरोबर पिकाची रोगप्रतिकार शक्ति वाढते. गंधकामुळे देखील कांद्याच्या साठवणूक क्षमतेमध्ये वाढ होते. 

२ ) सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता 

                   इतर पिकांना जशी सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते त्याचप्रकारे कांद्याला देखील गरज भासते. कांदा पिकाला लोह, तांबे, मॅगनीज, जस्त व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. कांद्यामध्ये काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यास त्यांचा परिणाम पातीवर तसेच कांद्यावर दिसून येतो. उदा.. तांब्याच्या कमतरतेमुळे कांदे कडक न राहता मऊ पडतात तसेच कांद्याचा वरील पापुद्रा ठिसुळ व फिकट पिवळा पडतो व गळून जातो. याच बरोबर बोरॉनच्या कमतरतेमुळे पात करड्या रंगाची तसेच नीळसर होते कोवळ्या पातीवर हिरव्या तसेच पिवळ्या रंगाचे डाग दिसतात. कांद्याची पात कडक आणि ठिसुळ होते. रोपांची वाढदेखील खुंटते. झिंकची कमी झाल्यास पात जाड होणे खालच्या बाजूने वाकणे इ लक्षणे दिसतात. 

३ ) सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर 

                   कांद्यावर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून कारायचा झाल्यास ती लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांपर्यंत द्यावे. तसेच फवारणीसाठी ४५ दिवसांनी एकदा व ६० दिवसांनी दुसर्‍यांदा द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे जानवल्यास किंवा ओळख आणि खात्री पटल्यानंतर त्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी त्या अन्नद्रव्यांची सल्फेटच्या स्वरुपात फवारणी केली तरी चालते. उदा. झिंक सल्फेट मॅगनीज सल्फेट, कॉपर सल्फेट ०.१ टक्के, फेरस सल्फेट ०.२५ टक्के, या प्रमाणात फवारणी करावी ( ०.१ टक्के म्हणजे १ ग्रॅम पावडर १ लीटर पाण्यात )

कांद्यावरील किड व रोग

                        कांदा या पिकावर फुलकिडे तसेच जमिनीतील आळी या किडींचा तर मर, जांभळा करपा, काळा करपा व तपकिरी करपा या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. 

कंदयावरील कीड 

फुलकिडे ( Thrips )

फुलकिडे 

                      फुलकिडे हे कांद्याच्या पातीमधील खरवडून रस शोषतात त्यामुळे पात वाकडी होते या किडीने रस शोषण्यासाठी खरवडलेल्या जागेमधून करपा रोगाच्या जंतुंची लागण होऊन करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच या कीडिमुळे पातीवर पांढरे चट्टे पडतात.  

फावरणी / उपाय 

                        या कीडीच्या नियंत्रणासाठी मिथाइल डेमेटॉन १० मी.ली किंवा सायपरमेथ्रिन ५ मी .ली. किंवा कार्बोसल्फान १० मी .ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने फवारण्या कराव्या. या व्यतिरिक्त डेल्टामेथ्रिन  + ट्रायझोफॉस  १०  मी . ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

कांद्यामधील आळि 

                      कांद्यामध्ये या आळिचा प्रादुर्भाव सुरूवातीला कांदा लहान असतांना आढळून येतो. ही आळि जमिनीमध्ये राहून  कांद्याचे बुड खाते. यामुळे बर्‍याच प्रमाणात पिकाचे नुकसान होते.

फवारणी / उपाय 

                      कांदा लागवड करत असतांना एकरी ३ ते ४ किलो फोरेट ( थायमिट ) खतामध्ये मिसळून टाकावे तसेच कांद्यामध्ये या आळिचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरीफॉस १० मी ली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून कांद्याच्या सरीमध्ये आळवणी ( ड्रिंचिंग ) करावी. याच बरोबर अंतरप्रवही कीटकनाशकांची फवारणी करावी. 

कांद्यामधील रोग 

कांद्यामधील मर 

                     कांदा या पिकामध्ये फ्यूजारियम या बुरशीमुळे मर या रोगाची लागण होते. या रोगाची लागण टाकलेल्या रोपामध्ये तसेच लागवडीनंतर शेतामध्ये आढळून येते. या रोगामुळे ८० ते ९० टक्के नुकसान  होऊ शकते. या रोगाची लागण झाल्यावर रोपे पिवळी पडतात. तसेच जमिनी लगतच्या रोपांचा भाग मऊ पडतो. व रोपे कोलमडुन सुकतात. कोलमडलेल्या रोपांच्या जमिनीलगत असलेल्या भागावर पांढर्‍या बुरशीची वाढ होते. दुसर्‍या वर्षी त्याच जागेवर रोपांची लागवड केल्यास मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. 

फावरणी / उपाय

                    कांद्याचे रोप किंवा कांदा लागवड ही मध्यम ते उत्तम निचरा होणार्‍या जमिनीतच करावी. त्याचबरोबर थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बोक्सिन २ ते ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमानात बियाण्याची बीजप्रक्रिया करून घ्यावी. येवढे करून देखील या रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कॅप्टन ३० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून दोन रोपांच्या ओळीमध्ये ड्रिंचिंग ( आळवणी ) करावी. व हलके पाणी द्यावे 

जांभळा करपा ( अल्टरनेरिया करपा ) 

                   कांद्यावर हा रोग अल्टरनेरिया पोरी अ. शेपूलीकोला या बुरशीमुळे होतो. हा रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत येतो. या रोगामुळे पातीवर सुरुवातीला लहान, खोलगट, पांढरट चट्टे पडतात. या चट्ट्यांचा मधला भाग जांभळट लालसर होतो. व कडा पिवळसर दिसतात. या रोगाची सुरुवात शेंड्याकडून होऊन पातीच्या खालच्या भागाकडे पसरत जाते. या रोगाचे प्रमाण वाढल्यास पात शेंड्याकडून जळू लागते, व नंतर संपूर्ण पात जळाल्यासारखी दिसते. कांदा लागवडीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये या रोगाची लागण झाल्यास पात जाळून जाते परिणामी पिकाची वाढ चांगली होत नाही. याचबरोबर पिकाची वाढ न झाल्यामुळे कांदा चांगला पोसत नाही परिणामी चिंगळी कांद्याचे प्रमाण वाढते. हा रोग कांदा पोसण्याच्यावेळी झाला तर रोग हा कांद्यापर्यंत पसरतो. परिणामी कांदा सडतो. 

फवारणी / उपाय 

                    लागवडीनंतर १५ दिवसाच्या अंतराने मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १० ग्रॅम किंवा कॅप्टन १० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून ३ वेळा फवारणी करावी तसेच लागवड करत असतांना बुरशीनाशकांच्या द्रावनामध्ये मुळया बुडवून लागवड करावी. नत्रयुक्त खतांचा जास्त किंवा उशिरा वापर करू नये. 

काळा करपा 

                   या रोगाचा प्रादुर्भाव कोलिटोट्रीकम या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुरूवातीला पातीवर गोलाकार काळे डाग पडतात. ठिपक्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पात काळी पडून वाळते व नंतर रोपे मरतात. 

फवारणी / उपाय 

                  या रोगाचा प्रादुर्भाव आढळताच  मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा टिब्युकोनॅझोल १० मी.ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

तपकिरी करपा

                  या रोगाचा प्रादुर्भाव स्टेम्फिलियम व्हेसीकारिअम या बुरशीमुळे होते. या बुरशीमुळे तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पातीच्या बाहेरील भागावर दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पात  सुकु लागते व जळाल्यासारखी दिसते.

फवारणी / उपाय 

                  या रोगांच्या नियंत्रणासाठी रोप लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब किंवा हेक्झकोनॅझोल किंवा प्रोपीकोनॅझोल या बुरशीनाशकांच्या शिफारशी नुसार आलटून पालटून ३ ते ४ फवारण्या कराव्यात. 


बटाटे लागवड

 बटाटे लागवड

 बटाटे लागवड, जमीन ,  बटाटे बियाणे प्रक्रिया, बटाटे खते व्यवस्थापन, बटाट्यावरील कीड व रोग 

बटाटा हे कंद वर्गीय प्रमुख भाजीपाला पीक आहे. बटाट्यामध्ये जीवनसत्व ब आणि क भरपूर प्रमाणात असते. त्याच प्रमाणे प्रथिने, चुना फॉस्फरस यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर होतांना दिसतो. बटाट्यामध्ये पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बटाटा हे शक्तिवर्धक सुद्धा आहे.

बटाटा हे  कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून या पिकाला योग्य  तसेच नियोजित पद्धतीने लागवड केल्यास कमी कालावधीमध्ये अधिक पैसे मिळवून देणारे पीक ठरू शकते. बटाट्यापासून निरनिराळे खाद्य पदार्थ निर्मिती करता येत असल्यामुळे त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून सुशीक्षित  बेरोजगारांनी आपल्या भागामध्ये प्रक्रिया उद्योग उभारल्यास बेरोज गारीची समस्या दूर करता येऊ शकते. 

जमीन

मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत तसेच कसदार भुसभुशीत व उत्तम निचर्‍याची जमीन ही  बटाट्याचे उत्पन्न घेण्यासाठी तसेच लागवडीस योग्य असते, लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा सामु सहा ते आठ च्या दरम्यान असावा. 

बियाणे प्रक्रिया

 बटाटे लागवडीसाठि हेक्टरी १५ ते २० क्विंटल बियाणे पुरेसे असते. लागवडीसाठी बियाणे निवडतांना चांगल्या दर्जाचे निवडावे. लागवडीपूर्वी बटाटे क्लोरीनेटेड पाण्यात धुवावे तसेच बटाट्याच्या फोडी करतांना कोयता ब्लॉयटॉक्स ( 0.3 टक्के ) किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड या औषधाच्या द्रावनात वरचे वर बुडवून घ्यावा.  लागवडीपूर्वी बियाणे ( तयार केलेल्या फोडी ) कॅप्टन ३० ग्रॅम किंवा बावीस्टीन १० ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १० ग्रॅम  १० लीटर पाण्यात मिसळून त्या द्रवनामध्ये बियाणे ( तयार केलेल्या फोडी ) ५ मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापराव्यात. 

खते व्यवस्थापन 

बटाटे लागवडी आधी हेक्टरी ४० ते ५० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे. तसेच लागवडीपूर्वी हेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो स्फुरद १२० किलो पालाश द्यावे.या व्यतिरिक्त १ महिन्याने हेक्टरी ५० किलो नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी.

अंतर मशागत

बटाट्याच्या पिकामध्ये अंतर मशागत करत असतांना तन काढणे तसेच खुरपणी याच बरोबर भर देणे हे महत्वाचे कामे आहेत. ३ ते ४ वेळा खुरपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी तसेच खताचा दूसरा डोस देत असतांना झाडांना मातीची भर द्यावी. ( भर देणे म्हणजेच झाडाच्या बुडाला माती लावणे ) 

बटाट्यावरील कीड व रोग 

बटाटा या पिकामध्ये देठ कुरतडणारी अळी, बटाटे पोखरणारी आळी किंवा पाकोळी, मावा, तुडतुडे, लाल कोळी, पाने खणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. याच बरोबर करपा ( लवकर येणारा व उशिरा येणारा ) मर रोग, बांगडी रोग या रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. 

बटाट्यावरील किड 

देठ कुरतडणारी आळी 

बटाट्यामध्ये देठ कुरतडणारी आळी ही राखाडी रंगाची असून ती रात्रीच्या वेळी जमिनीलगत खोडाजवळील भाग कुरतडते तसेच पाने व कोवळे देठ देखील खातात. 

फवारणी / उपाय

या आळीच्या नियंत्रणासाठी मीथाइल पॅराथीऑन हे कीटकनाशक हेक्टरी २५ किलो या प्रमाणात पिकामध्ये धुरळावे तसेच या कीडीच्या नियंत्रणासाठी खंदणी करतांना क्लोरोपायरीफॉस मातीमध्ये मिसळावे. पिकाच्या दोन ओळींमध्ये गवताचे ढीग ठेऊन त्याखाली लपलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. 

बटाटे पोखरणारी आळी

या अळ्या प्रथम पाने पोखरतात व नंतर शेतामध्ये तसेच साठवणीत बटाटे पोखरतात. 

फवारणी / उपाय

या अळ्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १० मि. ली. किंवा  क्विनॉलफॉस २० किंवा कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळनारी भुकटी ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच परोपजीवीकीटक कोपीडिसोमा कोहलेरी यांचे प्रती हेक्टरी ५०,००० प्रौढ किंवा १२५० ममीज या प्रमाणात पीक ४५ दिवसांचे झाल्यानंतर आठवड्याच्या अंतराने ४ वेळा शेतात सोडावे. 

मावा व तुडतुडे

मावा व तुडतुडे या दोन्ही किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात जास्त उपद्रव झालेल्या झाडांची पाने मुरडतात तसेच पिवळी पडून जळून जातात. 

फवारणी / उपाय 

बटाट्यामध्ये लागवडीनंतर १५ दिवसांनी किंवा या कीडीचा उपद्रव आढळल्यास मिथील डेमेटॉन १० मी.ली किंवा फॉस्फोमीडॉन ८५ डब्ल्यु एमसी १० मि.ली. १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी 

लाल कोळी

लाल कोळी ही कीड पानातील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे पाने व झाडे तांबूस रंगाची दिसू लागतात. व झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होते. 

फवारणी / उपाय

या किडीच्या नियंत्रणासाठी १० लीटर पाण्यात २० ते २५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक किंवा डायकोफॉल १८.५ ई. सी. हे कोळी नाशक १० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून बटाट्यावर फवारावे. 

पाने खणारी आळी

बटाट्यावर या आळीचा प्रादुर्भाव झाडांच्या वाढीवर परिणाम करतो. या अळ्या झाडांची पाने खातात. त्यामुळे झाडांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो परिणामी झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही व उत्पादन कमी येते.

फवारणी / उपाय 

पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्लोरो + सयपरमेथ्रिन १५ मी.ली. किंवा क्वीनॉलफॉस २० मी.ली. किंवा क्लोरोपायरीफॉस १५ मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या व्यतिरिक्त पाने खाणार्‍या आळयांच्या नियंत्रणासाठी एस. एल, एन. पी, वी. हे विषाणू  ५०० मी.ली. प्रती हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.

बटाट्यावरील रोग

लवकर व उशिरा येणारा करपा

बटाट्यावरील करपा ( लवकर व उशिरा येणारा करपा )

बटाट्यावर लवकर येणारा करपा हा रोग अल्टरनेरिया सोलानी या बुरशीमुळे होतो. या बुरशीमुळे पानांवर काळपट ठिपके दिसतात. तसेच यामुळे पाने करपून गळतात. याच प्रकारे उशिरा येणारा करपा हा रोग फायटोप्थोरा इनफेस्टन्स या बुरशीमुळे होतो. या बुरशीमुळे पानांवर पानथळ, फिकट तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात. 

फवारणी / उपाय 

या रोगाच्या नियंत्रणासाठी बेणे लागवड तयार करत असतांना बीज प्रक्रिया करून लावावे. तसेच रोग प्रतिकारक्षम जातीची निवड करावी. पीक लहान असतांना मॅन्कोझेब २० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने फवारावे. त्याच प्रकारे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २५ ग्रॅम यापैकी कोणतेही  एक औषध १० लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.

मर रोग

बटाटा पिकामध्ये फुजॅरियम या बुरशीमुळे झाडांची पाने पिवळी होतात. व झाडे मरतात त्याच प्रकारे बटाट्यामध्ये व्हर्टीसिलीयम या बुरशीमुळे झाडे ही खालून वरच्या बाजूला पिवळसर होत जाऊन पाने गळतात. व पाने जळाल्यासारखी दिसतात.

फवारणी / उपाय 

या रोगाच्या नियंत्रणासाठि पिकांची फेरपालट करावी तसेच पिकाला नियमित पाण्याच्या पाळया देऊन हा रोग आटोक्यात आनता येतो. लागवडीच्या वेळी ५ किलो ट्रायकोडर्मा + २५ क्विंटल निंबोली पेंड प्रती हेक्टरी मिसळावी. याच प्रकारे जमिनीमध्ये नॅप्थलीन किंवा फॉरमॅलीन ( १:५० ) मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते. 

बांगडी रोग 

बटाट्यावरील हा रोग क्लेव्हीबॅक्टर मीचीगॅनेन्सीस या अनूजीवापासून होतो. रोगाची लागण झालेली झाडे ही पिवळी पडून कोमेजल्यासारखी दिसतात आणि अचानक मारतात. तसेच रोगट बटाटे कापल्यावर आत बांगडीच्या आकाराचा तपकिरी रंगाचा रोगट भाग दिसतो. 

फवारणी / उपाय 

या जिवाणूजन्य रोगाची लागण झालेली बटाटे बेण्यासाठी वापरू नये. रोगग्रस्त बटाटे नष्ट करावेत. तसेच बटाट्याची लागवड करत असतांना स्ट्रेप्टोसयक्लीन चे दोनशे पी.पी. एम च्या द्रवणात बेणे एक तास बुडवून लावावी. 

टोमॅटो लागवड

टोमॅटो 

टोमॅटो लागवड, टोमॅटोचे महत्व, टोमॅटो खते नियोजन, टोमॅटो रोग माहिती, टोमॅटो फवारणी

                       शेतकरी बांधवांनो जसेकी आपल्याला माहीतच आहे की टोमॅटोचे रोजच्या आहारात किती महत्व आहे. तसेच भाजीपाला पिकामध्ये टोमेटोला महत्वाचे स्थान आहे. आपल्या राज्याचे हवामान या पिकास अनुकूल असून जमीन, पीक ( वान ), हवामान, पाणी, खत तसेच पीक संरक्षण व कीड आणि रोगाचे वेळीच नियोजन केल्यास टोमॅटोचे उत्पादन प्रती हेक्टर ६० ते ७० टीन पर्यंत सहज वाढू शकते.

          शेतकरी बांधवांनो आताच्या परिस्थिति नुसार वातावरणात सतत होणार्‍या बदलामुळे टोमॅटो पिकावर रोग व किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. बर्‍याचदा अश्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना आपला उभा टोमॅटोचा प्लॉट ( फड ) करपून जातांना पहावा लागतो. या मागील कारण वातावरन हे असुशक्ते परंतु रोगाबद्दल आणि किडीबद्दल अपुरी माहिती तसेच चुकीच्या फवारन्या  हे देखील कारण असू शकते. ( दोन्ही शक्यता नाकारता येत नाही.)  🙏  म्हणूनच शेतकरी बांधवांनो कुठल्याही पिकावर लागणारी कीटकनाशके, बुरशीनाष्के तसेच पिकाच्या अवस्ते नुसार लागणारी खते तसेच संजीवके यांच्या बद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे. खरेतर काळाची गरज आहे.🙏

टोमॅटोचे महत्व 

             टोमॅटोचा वापर जसा रोजच्या आहारामध्ये होतो तसाच बरेचसे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यासाठीसुद्धा होतो. त्यामध्ये टोमॅटो केचअप, टोमॅटो सूप, टोमॅटो सॉस, टोमॅटो चटणी इ. पदार्थ बनवता येतात. यामुळेसुद्धा चांगल्या प्रतीचे टोमॅटो उत्पादन केल्यास आर्थिक नफा होऊ शकतो. टोमॅटोवर आधारित प्रक्रिया उद्योगांना राज्यातच नव्हे तर देशातही मोठा वाव आहे. टोमॅटो हे एक संरक्षक अन्न असून टोमॅटोमधील लयकोपिन या अल्कलाईड रंगद्रव्यामुळे शरीरातील पेशी मरण्याचे प्रमाण हे कमी होते. टोमॅटो हे फळ आहारच्या दृष्टीने आरोग्यासाठि फायदेशीर आहे. 

टोमॅटो खते नियोजन

                 टोमॅटोची लागवड करत असतांना खत नियोजन हे फार महत्वाचे आहे. टोमॅटो लागवडीसाठी रेताड, मध्यम, काळी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. तसेच अति हलकी, क्षारयुक्त, चोपण, पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. साधारण जमिनीचा सामु साडे सहा ते सात असावा. टोमॅटोमध्ये खत व्यवस्थापन करत असतांना माती परीक्षण करून योग्य प्रमाणात खते वापरावी यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश या खतांच्या व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशीयम, गंधक आणि याच बरोबर दुय्यम अन्नद्रव्ये तसेच जस्त, लोह, बोरॉन, मॅगनीज व तांबे इ. सूक्ष्म अन्नद्रव्य जमीन व पिकानुसार आवश्यकतेनुसार वापरावे.

१ ) टोमॅटो सेंद्रिय खतांचा वापर :- 

                      टोमॅटोमध्ये सेंद्रिय खत वापरायचे असल्यास प्रती हेक्टरी २५ टन चांगले  कुजलेले  शेणखत व २०० किलो निंबोळी पेंड यांचा वापर करावा. 

२ ) टोमॅटोमध्ये रसायनिक खते :-

                     टोमॅटोची लागवड जर मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये तसेच संकरीत वानासाठी हेक्टरी ३०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि १५० किलो पालाश वापरावे. त्याचप्रकारे सुधारित व सरळ वाणसाठी हेक्टरी २०० किलो नत्र १०० किलो स्फुरद आणि  १०० किलो पालाश यांचा वापर करावा. या व्यतिरिक्त संकरीत, सुधारित व सरळ वनासाठी हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट , २५ किलो मॅगनिज सल्फेट, ५ किलो बोरॉन व २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट वापरावे. 

                     खते देतांना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी वापरावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४०, ५५ दिवसांनी समान हप्त्यामध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून ४ बोटांच्या अंतरावर मुळ्यांच्या क्षेत्रात माती आड करून द्यावे. तसेच खते दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे याशिवाय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य लागवडीपासून ५ ते ७ दिवसांनी देण्यास सुरुवात करावी. 

३ ) जैविक खते :- 

                  जैविक खतांचा वापर करत असतांना एकरी २ किलो अँझक्टोबॅक्टर २ किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू व २ किलो पालाश विरघळविणारे जिवाणू हे सर्व एक टन शेणखतामध्ये मिसळून वापरावे. 

टोमॅटो रोग माहिती 

                 टोमॅटो या पिकावर  पांढरी माशी, फुलकिडे, नाग आळी व फळे पोखरणारी आळी या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या बरोबर अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट ( लवकर व उशिरा ) येणारा करपा, बोकडा, ( पर्णगुच्छ ) फळसड, मर, भुरी, स्पॉटेड विल्ट व्हायरस इ. रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. यांची लक्षणे व उपाय सविस्तर जाणून घेऊ.

टोमॅटोवरील कीड

पांढरी माशी

१ ) पांढरी माशी :-

                टोमॅटो या पिकावर सुरवातीला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. पांढरी माशी पानातील अन्नरस शोषून घेते त्यामुळे पिकाची पाने पिवळी पडतात. ही कीड पानांंतील रस शोषण करण्या सोबतच पारदर्शक द्रव पदार्थ टाकतात. त्या द्रवामुळे पानांवर काळी बुर्शी येते. त्यामुळे पिकाची वाढ कमी होते आणि उत्पादन कमी येते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे लिफ कर्ल या रोगाचा देखील प्रसार होतो. म्हणून या किडीचा वेळीच बंदोबस्त करावा.

फवारणी / उपाय :-

               पांढर्‍या मशीच्या नियंत्रणासाठी  इमिडाक्लोप्रिड ४ मि. लि. किंवा डायमेथोएट १० मि. लि. किंवा मिथिलडिमेटॉन १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याच बरोबर शेतामद्धे पिवळे आणि निळे चिकट सापळे लावावेत यामुळे देखील रसशोषन करणार्‍या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते.

फुलकिडे ( Thrips )

२ ) फुलकिडे :-

                    फुलकिडे ही देखील रसशोषण करणारी किड आहे. फुलकिडे हे पानातील अन्नरस शोषून घेतात  त्यामुळे पाने पांढरी होतात तसेच वाकडी तिकडी होतात. या किडीमुळे स्पॉटेड विल्ट व्हायरस या विषाणूमुळे होणार्‍या रोगाचा प्रसार होतो.

फवारणी / उपाय

                      शेतामद्धे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याकिडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १० मि. लि. किंवा इमिडाक्लोप्रिड ४ मि. लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ते ७ मि. लि. किंवा मिथाईल डिमेटॉन १० मि. लि. १० लीटर पाण्यात निसळून फवारणी करावी.

 नाग आळी

३ ) नाग आळी :-

                  नाग आळीची माशी हि अगदी लहान असून ती सहजा सहजी निदर्शनास पडत नाही परंतु तिच्या आळीमुळे प्रादुर्भाव झालेलि पाने हि मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. या किडीची आळी हि पानाच्या वरील पापुद्रयाखाली राहून त्यामधील हिरवा भाग पोखरून खातात व खातपुढे सरकते. त्यामुळे हि आळी जशी पुढे सरकते तशा पानांवर पांढर्‍या नागमोडी रेषा पडलेल्या दिसतात. नाग आळीच्या पानांवरील प्रादुर्भावामुळे पानांच्या अन्नतयार करन्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि उत्पन्न कमी होते.

फवारणी / उपाय

              पिकामध्ये हि किड आढळून आल्यास सायपरमेथ्रिन ५ मि. लि. किंवा डेल्टामेथ्रिन ४ मि. लि. किंवा फिप्रोनील १५ मि.लि. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळे पोखरणारी आळी

४ ) फळे पोखरणारी आळी

या किडीचा मादी पतंग हा पानांवर तसेच फुलावर अंडे घालतात. अंड्यातून आळी बाहेर पडल्यानंतर कोवळी पाने खावून वाढते व कालांतराने फळे आल्यावर फळे खावू लागते. हि आळी फळाला छिद्र पडून पुढील अर्धे शरीर फळात ठेवून फळ खाते. त्यामुळे फळे सडतात. जानेवारी ते मे दरम्यान या आळीचा प्रादुर्भाव जास्त असतो.

फवारणी / उपाय

               या आळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डेल्टामेथ्रिन ५ मि. लि. किंवा मिथाईल डेमॅटॉन (२५ टक्के प्रवाही) १५ मि. लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ते ७ मि. लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच या किडीचा फळांवरील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. कामगंध सापळ्यांच्या वापरामुळे किड बर्‍याच प्रमाणात आटोक्यात येते.

टोमॅटोवरील रोग

लवकर येणारा करपा ( अर्ली ब्लाईट )

१ ) लवकर येणारा करपा ( अर्ली ब्लाईट )

                टोमॅटो पिकावर लवकर येणारा करपा  अल्टरनेरीय सोलाणी या नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. लवकर येणार्‍या करप्याची लक्षणे प्रथम जुन्या पानांवर तसेच फांद्यां आणि फळांवर दिसतात. यामध्ये सुरवातीला राखाडी ते तपकिरी रंगाचे ठिपके पानांवर येतात नंतर ते हळूहळू केन्द्रित होतात व वाढू लागतात, या डागांभवती ठळक पिवळी कडा असते. यारोगाचा प्रादुर्भाव जसजसा वाढू लागतो तसे पूर्ण पान पिवळे होवून गळून पडते, त्यामुळे पानगळ मोठ्या प्रमाणात होते. तसेच  केंन्द्रित डाग हे फांद्यावर तसेच फळांवरती दिसू लागतात.

फवारणी / उपाय

               पिकामध्ये या रोगाची लागण होवू नये यासाठी लागवडीच्या वेळी जमिनीमध्ये प्रती एकरी २ किलो ट्रायकोडर्मा पावडर चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे. शेतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा रोगाची लक्षणे दिसताच मॅनकोझेब २५ ग्रॅम आणि टेब्यूकोनॅझोल ५ मि. लि. या बुरशी नाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा मॅनकोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड २५ ते ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोणील २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करवी.

उशिरा येणारा करपा ( लेट ब्लाईट )

२ ) उशिरा येणारा करपा ( लेट ब्लाईट )

                 टोमॅटो पिकावर उशिरा येणारा करपा फायटोप्थोरा इन्फेस्टन्स या नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. उशिरा येणार्‍या करप्याची लक्षणे पानांच्या वरच्या बाजूच्या कडेने थोडेसे तपकिरी हिरवे ठिपके येतात. कालांतराने हे ठिपके ( एकत्र येवून ) एकमेकात मिसळून पानांचा मोठा भाग तपकिरी रंगाचा होतो. या रोगाचा प्रादुर्भाव जस जसा वाढत जाईल त्या प्रमाणात पाने तपकिरी होवून गोळा झालेली दिसू लागतात. त्याच प्रमाणे ओल्या वातावरणात पानाच्या खालच्या बाजूने असलेल्या ठिपक्यावर राखाडी ते पांढर्‍या बुरशीची लागण होते ज्यामुळे  आपल्याला निरोगी भाग व सुकलेल्या भागातील फरक सहज लक्षात येतो. फळावर हा रोग राखाडी हिरवे ते मळकट तपकिरी रंगाच्या आणि सुकलेल्या डागाच्या स्वरुपात दिसतो. या डागाजवळील फळांचा गरहा कडक होतो.

फवारणी / उपाय

                 रोगाची लक्षणे दिसताच मॅनकोझेब २५ ग्रॅम आणि टेब्यूकोनॅझोल ५ मि. लि. या बुरशी नाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा मॅनकोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड २५ ते ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोणील २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करवी. या बुरशीनाशका व्यतिरिक्त मेटॅलॅक्झील एम झेड - ७२ किंवा फोसेटील ए. एल २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पानावरील ठिपके

३ ) पानावरील ठिपके

                  टोमॅटो पिकावर पानावरील ठिपके सेप्टोरिया लायकोपेरसिसा या नावाच्या बुरशीमुळे येतात. या रोगाची लक्षणे खालून वर म्हणजे जुन्या पानांकडून नवीन कोवळ्या पानांपर्यंत पसरतात. या रोगाचे पानांवर बारीक पाणी शोषलेले गडद तपकिरी कडा असलेले राखाडी रंगाचे गोलाकार ठिपके जुन्या पानांनवर खालच्या बाजूला उमटतात. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास डाग मोठे होतात व एकमेकात मिसळतात आणि त्यांच्या केंद्रात काळ्या रंगाचे ठिपके दिसू लागतात. खोडावर व फुलांवर याच पद्धतीचे लक्षणे दिसून येतात. जास्त प्रादुर्भाव झालेली पाने फिकट पिवळी होतात आणि वाळून गळतात, पानांची गळ झाल्यामुळे फळे उन्हात करपतात. या रोगाचा प्रादुर्भाव फळांवर फार कमी म्हणजे कधीतरी दिसून येतो.

फवारणी / उपाय

              या रोगाची लक्षणे दिसताच  मॅनकोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड २५ ते ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोणील २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करवी.

पर्णगुछ किंवा बोकडा ( लिफ कार्ल )

४ ) पर्णगुछ किंवा बोकडा ( लिफ कार्ल )

                            आपण ज्याला बोकडा किंवा पर्णगुछ म्हणतो तो एक विषाणूजन्य रोग आहे.  हा रोग टोबेको लीफकर्ल व्हायरस या विषाणू मुळे होतो. या रोगामुळे पाने वाकडी होतात व झाडाची वाढ खुंटते तसेच पाने पिवळी पडतात. झाड खुजे राहून पर्णगुछासारखे दिसते. त्यामुळे झाडाला फुले व फळे लागत नाही. किंवा लागलेच तर त्यांचा आकार लहान राहतो. या रोगाचा प्रसार हा पांढर्‍या मशीमुळे लवकर होतो.

फवारणी / उपाय

                      या रोगाची लागण पिकाच्या सुरवातीच्या अवस्थे मध्ये जास्त प्रमाणात आढळत असल्या मुळे रोपांवर डायमेथोएट किंवा मिथाईल डिमेटॉन १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच रोपांची लागवड करत असतांना इमिडाक्लोप्रिड १० मि. लि. किंवा कार्बोसल्फान २० मि. लि. + ट्रायकोडर्मा पावडर ५० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळावी व या द्रावणात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवून लावावी. तसेच लागवडी नंतर १५ दिवसांच्या अंतराने रसशोषण करणार्‍या किडींसाठी कीटकणाषकाची फवारणी करावी.

फळ सड ( बक आय रॉट )

५ ) फळ सड ( बक आय रॉट )

                    हा रोग फायटोप्थोरा निकोशियाना पॅरासिटिकाफायटोप्थोरा कॅपसीसी या बुरशी मुळे होतो. या बुरशीमुळे बक आय रॉट हा रोग होतो. यारोगामुळे फळावर बदकाच्या डोळ्याच्या आकाराचे तपकिरी रंगाचे वलय दिसतात अशी वलये नंतर सडतात.

फवारणी / उपाय

                  या रोगाची लागण होताच झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त फळे, पाने गोळाकरून बांधावर किंवा  टोमॅटो प्लॉटच्या शेजारी न टाकता त्यांना जमिनीत गडावीत किंवा जाळून नष्ट करावीत. तसेच मेटॅलॅक्झील एम झेड - ७२ किंवा फोसेटील ए. एल २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

७ ) मर

                मर हा रोग फुजारियम व व्हरटीसेलियम या बुरशीमुळे होतो. फुजारियम या बुरशीमुळे रोगग्रस्त झालेली रोपे किंवा झाडे पिवळसर होवून अचानक वाळतात. तसेच व्हरटीसेलियम या बुरशीमुळे रोगग्रस्त झालेली रोपे किंवा झाडे खालून वर पिवळसर होत जातात व गळून पडतात.

फवारणी / उपाय

                  या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम ३ ग्रॅम + मेटॅलॅक्झिल ६ ग्रॅम प्रती किलो बियाणे बिजप्रक्रिया करावी. तसेच लागवडीपूर्वी जमिनीत हेक्टरी ५ किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या शेनखतात मिसळून टाकावे. या रोगाची लक्षणे दिसताच बेनोमिल किंवा कार्बेन्डेझिम १० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून झाडांच्या मुळा भोवती ओतावे  आळवणी ( ड्रिंचिंग ) करावी.

भुरी ( Powdery Mildew )

८ ) भुरी ( Powdery Mildew )

                 भुरी हा रोग लेव्हेलुला टावरीका या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूवर पांढरे चट्टे पडतात आणि त्यांचे प्रमाण वाढल्यास पानांची गळ होते. भुरी या रोगाचा प्रादुर्भाव फांद्या तसेच फळांवर सुधा होतो. यामध्ये सुरवातीला पानाच्या वरच्या बाजूला पिवळसर डाग दिसतात. नंतरच्या काळात  या रोगामध्ये सुरवातीला पांढरी व नंतर राखाडी पिठासारखी पावडर पानांवर तसेच फांद्या व फळांवर पसरून त्यांना झाकून टाकते.

फवारणी / उपाय

                   भुरीच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप किंवा ट्रायडेमॉर्फ किंवा ट्रायडीमिफॉन किंवा टेब्यूकोनॅझोल ५ टे १० मि. लि. / ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

९ )  टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस

                       टोमॅटोवर हारोग विषाणूद्वारे होतो. या रोगामुळे सुरवातीला शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस काळसर चट्टे व ठिपके दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यास काही ठराविक दिवसात कोवळी पाने करपून काळी पडतात. रोगामुळे झाड खुरटे राहते व झाडांना फुले व फळे लागत नाहीत. फळे लागलीच तर त्यांची वाढ पूर्ण होत नाही ते लवकर पिकतात रंगात बदल जाणवतो. शेवटी पूर्ण झाड वाळते.

फवारणी / उपाय

                      रोपांची लागवड करत असतांना इमिडाक्लोप्रिड १० मि. लि. किंवा कार्बोसल्फान २० मि. लि. + ट्रायकोडर्मा पावडर ५० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळावी व या द्रावणात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवून लावावी. हा रोग फुलकिडी मुळे होत असल्याने फुलकीडींचा वेळीच बंदोबस्त करावा.

🙏🙏  शेतकरी बांधवांनो माहिती शेअर जरूर करा 🙏🙏

🌾🌾जय जवान जय किसान🌾🌾