वांग्यावरील कीड रोग व उपाय

🍆🍆  वांगे  🍆🍆

मित्रांनो आज आपण वांग्यावरील कीड व रोग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेवूयात

🍆🍆 वांग्यावरील कीड :-

मित्रांनो सुरवातीच्या कळामध्ये वांग्यावर जो कीडीचा प्रादुर्भाव जाणवतो तो म्हणजे पांढरी माशी , तुडतुडे व मावा यांचा प्रादुर्भाव कसा ओळखावा व काय उपाय योजना करावी ते पाहू

१ ) तुडतुडे :-

तुडतुडे ही कीडी प्रामुख्याने पानाच्या खलील भागावर आढळते, पिले आणि प्रौढ ही पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात तसेच या किटकान मळे पर्णगूच्छ या विशांनुजन्य रोगाचा देखील प्रसार होतो.


 
                            तुडतुडे

२ ) मावा :-
                मावा ही देखील रस शोषण करणारी किडी आहे, हे कीटक पानातील रस शोषतात त्यामुळे पाने पिवळी पडतात तसेच पाने चिकट होवून ती काळी पडतात.

मावा

नियंत्रण आणि उपाय  :-
                                    तुडतुडे व मावा या रस शोषण करणार्‍या किडीच्या नियंत्रणासाठी  खलील काही बाबी महत्वाचा ठरतात . त्यामध्ये सुरवातीच्या काळात पिकामध्ये पिवळा व निळा चिकट ( स्टिकी पॅड ) ट्रेपचा तसेच ईनसेक्ट नेटचा वापर करावा. या नंतर देखील कीड नियंत्रणात येत नसेल तर रासायनिक कीटकणाशकांचा वापर करावा.

           रसशोषक किडींचे नियंत्रण करत असतांना एकाच कीटकणाशकांचा एका हंगामात जास्तीत जास्त 2 वेळा वापर करावा.

कोणत्याही गटामधील किटकणाशकांचा एका हंगामात ३ पेक्षा जास्त वेळेस वापर करू नये , तसे केल्या किडीमध्ये प्रतिकार शक्ति निर्माण होण्याचा धोका केतेक पटीने वाढतो आणि मग याचा परिणाम म्हणजे किड नियंत्रणा बाहेर जाते.

किटकनाशके निवडतांना ते एका पेक्षा जास्त प्रकारच्या रसशोषक किडींच्या नियंत्रणात उपयोगी ठरेल ह्या नुसारच निवडन्याचा प्रयत्न करावा.

पांढर्‍या मशीचे  प्रौढ किटकणाशकांच्या फवारणीतून लवकर नियंत्रणात येत नाहीत. त्यामुळे या किडीच्या लाहान अवस्थेतच  नियंत्रण करावे जेणे करून प्रादुर्भाव वाढणार नाही.

किड हि पिकाच्या वाढीच्या अवस्तेनुसार हल्ला न करता , तापमान आणि वातावरणातील आद्रता हि किडीस अनुकूल असल्या देखील हल्ला करते हे लक्षात ठेवून फवारणीचे नियोजन करावे. पहिल्या फवारणीसाठी सहज उपलब्ध होणार्‍या काही कीटकणशकांचे ( घटकांची ) नवे व त्यांचा कोणत्या किडींसाठी वापर होतो हे थोडक्यात खाली दिले आहे.      किटकनाशकां
तील घटक
तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी

     1) असिफेट
X

     2) क्लोरपायरीफॉस X X
     3) क्विनालफॉस X
     4) डायमेथोएट
     5) प्रोफेनोफॉस
     6) फॅसोलोन X
     7) मोनोक्रोटोफॉस X

( टीप. दिलेले कीटकणाशके हि  रोगाचा प्रादुर्भाव किती आहे , हे जाणून वापरावे आणी फवारणी साठी १ पेक्षा जास्त कीटकणाशके अकत्रित वापरू नये )

लाल कोळी
३ ) लाल कोळी :-
                       लाल कोळी हे लालसर तांबूस रंगाचे असतात. पिल्ले आणि प्रौढ पानाच्या वर आणि खाली राहून त्यातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पांढरट पडतात. पानावर जाळे तयार होते . आणि झाडाची वाढ खुंटते.

उपाय :-
             पिकावर कोळे आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम , किंवा डायकोफॉल २० मि. लि. १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

शेंडे पोखरणारी आळी


शेंडे आणि फळे पोखरणारी आळी :-
                                 शेंडे पोखरणारी आळी प्रथम कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते त्यामुळे शेंडे वळतात. आणि फळे आल्यावर फळे फळे पोखरतात अशी फळे खाण्यास व विक्री करण्यास निरुपयोगी असतात व त्यामुळे उत्पन्नात घाट होते.

उपाय :- 
            १ ) किडग्रस्त शेंडे आणि फळे काढून नष्ट करावी 
२ ) शेंडे आणि फळे पोखरणार्‍या आळीच्या नियंत्रणासाठी ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी कींवा सायपरमेथ्रिन ५ मी.लि. कींवा प्रोफेनोफॉस २० मि.लि. १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे . फळमाशीचे कामगंध सापळे देखील वापरावे .

फळे पोखरणारी आळी

Comments

Popular posts from this blog

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक १६ अन्नद्रव्य

कापसा वरील किड व रोग

Ginger Farming Full Information