सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्यांचे कार्य


 सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्यांचे कार्य 






शेतकरी मित्रांनो आज आपण सूक्ष्म अन्नद्रव्य यांचे पिकावरील कार्य बघू आणि पिकावरील परिणाम याबद्दल थोडी माहिती जाणून घेवू. सविस्तर माहिती  लवकरच देवू




सूक्ष्म अन्नद्रव्य व माहिती खालील प्रमाणे





1)  लोह ( Iron - Fe )


महत्व  :- लोह हा घटक अत्यंत महत्वाचा घटक आहे.(क्लोरोफिल) हरित द्रव्या मुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो. वनस्पति लोह शिवाय हरित द्रव्य निर्मिती करू शकत नाही. शिवाय , वनस्पति ऑक्सीजन पण घेवू शकत नाहीत. म्हणून लोह हा घटक पानांचा हिवरा रंग कायम ठेवण्यास मदत करतो.





2) मॅगनीज ( Manganese - Mn )


महत्व :- प्रकाशसंश्लेषण, श्वासोच्छवास, आणि नायट्रोजन योग्य पद्धतीने ग्रहण करणे यासारख्या विविध कार्य साठि वंनस्पतींमधे मॅगनीजचा वापर होतो. मॅगनीज मुळे पराग उगवण , परागनलिकामद्धे वाढ होते आणि रोगजनकांच्या प्रतिकारशक्ति मध्ये वाढ होते. मॅगनीज च्या कमतरते मुळे पिकांची वाढ खुंटते आणि पीक आहे त्याच स्थितिमध्ये राहतात.





3) झिंक ( Zinc - Zn )


महत्व :- हे आठ आवशक पोषक घटकानमधील  एक आहे. वंनस्पतींसाठी कमी प्रमाणामध्ये आवशक असले तरी रोपांच्या विकाससाठी महत्व पूर्ण आहे. हे झाडांमधील अनेक ईनझाईम्स आणि प्रथिने यामधील एक मुख्य घटक आहे. जस्त हे विशिष्ट प्रथींनांच्या संश्लेषनासाठी जवाबदार असलेल्या ईनझाईमला सक्रिय करतात. हे क्लोरोफील आणि काही कार्बोहायड्रेट निर्मिती , स्टार्च चे साखरेत रूपांतर करणे तसेच वनस्पतींच्या उतीमध्ये तापमान रोखण्यास मदत करते.





4) तांबे ( Copper - Cu )


महत्व :- तांबे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमधे आवशक भूमिका पार पाडत असते. पिकांच्या श्वसन प्रक्रियेसाठि आवशक असते. पिकांच्या फळाची चव, रंग आणि फुलांचा रंग हा योग्य प्रमाणात तांबे (Copper)  असल्यास उत्तम होतो. तांबे स्थिर आहे म्हणजेच त्याच्या कमतरतेची लक्षणे नवीन पानांमध्ये उदभवतात. नवीन येणारी पाने लहान येतात आणि पानांना तेज नसते. 





माँलिब्डेनम ( Molybdenum - Mo )


महत्व :- पिकामद्धे असलेले नायट्रेट किंवा मातीतून घेतलेले नत्र हे प्रोटीन मध्ये रूपांतरित करण्यासाठी  माँलिब्डेनम चा उपयोग होतो. माँलिब्डेनम योग्य प्रमाणात न मिळाल्यास नत्राची कमतरता असलेली लक्षणे दिसून येतात . आणि त्यामुळेच नायट्रेट न वापरता सांच्यय झाल्याने पाणांच्या कडा करपल्यासारख्या  दिसतात.





बोरॉन (Boron - B)


महत्व :- बोरॉन हे पिकांमध्ये कोशिका विभाजनाचे (Cell Division ) कार्य करतात. या पृथ्वीवरील कोणत्याही सजीवाची वाढ होत असताना त्याच्या कोशिकाचे विभाजन होत असते. कोशिका विभाजनामध्ये व्यतेय आला तर पिकांची योग्यप्रकारे वाढ होत नाही. बोरॉनची कमतरता ही कोंबांच्या वाढीमध्ये फूल आणि फळामध्ये दिसून येते.

















Post a Comment

Previous Post Next Post