मुख्य अन्नद्रव्य भाग 1 पिकावरील नत्र कमतरतेची लक्षणे तसेच उपाय


 पिकावरील नत्र कमतरतेची लक्षणे तसेच उपाय

1) फुटीच्या तळाकडील पाणी अगोदर पिवळी होतात व नंतर शेंड्याकडील पाने पिवळी पडू लागतात

2) वेलवर्गीय पिकाची वाढ कमी प्रमाणात होते

3) पानांचा रंग एक सारखा प्रथम फिकट व नंतर पिवळा होतो

4) नत्राची कमतरता जास्त असल्यास पाने लालसर किंवा भूरकट होऊन गळू लागतात

5) नत्राच्या कमतरतेमुळे नवीन फुट, डेट आणि फुटीच्या खोडाचा कुंज का पिंक किंवा लाल रंगाचा होतो

6) नत्राच्या कमतरतेमुळे पाणी कमी प्रमाणात असणाऱ्या भागात पानाच्या कडा वरील बाजूस वळतात व नंतर वाळून जातात

7) जमिनीचा चांगल्या प्रमाणात निचरा नसेल तर वेलवर्गीय पिकाच्या पानांवर पिवळसर रंगाची छटा निर्माण होते


 खाली दिलेल्या प्रकारच्या जमिनीत नत्राची कमतरता जास्त प्रमाणात आढळून येते

1) वाळूचे प्रमाण असणाऱ्या जमिनीत व भरपूर पाणी साचणाऱ्या असणाऱ्या जमिनीत जमिनीत

2) सेंद्रिय पदार्थ कमी असणाऱ्या जमिनीत देखील नत्राची कमतरता भासते

नत्राची कमतरता दूर करण्यासाठी खालील उपाय योजना कराव्यात

( सर्वप्रथम माती परीक्षण करून घ्यावे)

1 नत्राचे प्रमाण असणाऱ्या खतांचा वापर जमिनीतून किंवा फवारणीद्वारे करावा

2 शेणखत तसेच पेंडी यांचा वापर केल्यास नत्राची कमतरता जास्त भासत नाही

3 आज-काल बाजारामध्ये मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची नत्राचे प्रमाण असणारी लिक्विड मधील खते ड्रीप द्वारे वापरता येतात त्यांचादेखील वापर करावा

मित्रांनो पुढील पोस्ट मध्ये स्फुरद या घटकाच्या कमतरतेची लक्षणे जाणून घेऊ

Comments

Popular posts from this blog

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक १६ अन्नद्रव्य

कापसा वरील किड व रोग

Ginger Farming Full Information