मुख्य अन्नद्रव्य भाग 2 पिकांमधील स्फुरदाच्या कमतरतेची लक्षणे व उपाय

 
नमस्कार मित्रांनो आधीच्या पोस्टमध्ये आपण नत्राच्या कमतरतेची लक्षणे बघितली आता या पोस्टमध्ये आपण स्फुरद या घटकाच्या कमतरतेची लक्षणे पाहणार आहोत स्फुरद म्हणजे ज्याला आपण सुपर फॉस्फेट म्हणतो

1) स्फुरदाच्या कमतरतेमुळे वेलीच्या शेंड्याची व मुळांची वाढ खुंटते

2) याचबरोबर पानाचे देट व कडाही लालसर होतात

3) वेलवर्गीय पिकांमध्ये पाणी लहान राहतात व त्यावर लाल रंगाचे डाग दिसतात

4) पानांच्या शिरा काही प्रमाणात निळसर दिसतात तर पानांच्या कडा खालच्या बाजूस वळतात

5) याचबरोबर फळ धारणेचे प्रमाण देखील घटते

मित्रांनो खालील प्रकारच्या जमिनीत स्फुरदाची कमतरता जास्त प्रमाणात आढळते

1) ज्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण आढळते ( चुनखडीयुक्त जमीन )

2) जास्त काळ पाणी साचून राहणारी जमीन

खाली दिलेल्या काही कारणांमुळे स्फुरदाची कमतरता आढळून येते

1) जमिनीमध्ये जास्त काळ ओलावा राहणे

2) कॅल्शियम बरोबर क्रिया होऊन कॅल्शियम फॉस्फेट तयार होते त्यामुळे वेलींना स्फुरद घेता येत नाही

3 ) कमी तापमानामुळे वेलींना स्फुरद घटक घेता येत नाही

मित्रांनो स्फुरदाची कमतरता आढळून आल्यास करण्यासाठी खाली दिलेले काही उपाययोजना करता येतील

1) सुपर फॉस्फेट किंवा डाय अमोनियम फॉस्फेट या खताचा वापर करावा

2) फवारणीद्वारे फॉस्फरिक ऍसिड चा वापर काही बागायतदार अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर करताना आढळतात याचे परिणामही चांगले असल्याचे आढळून आले आहे

3) जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात शेणखताचा वापर करावा त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते व स्फुरद उपलब्धतेचे प्रमाणही वाढते

मित्रांनो आपण नत्र आणि स्फुरद या घटकांच्या कमतरतेची लक्षणे बघितले पुढील पोस्ट मध्ये आपण पालाशच्या कमतरतेची लक्षणे बघूया

Post a Comment

Previous Post Next Post