Posts

बटाटे लागवड

Image
 बटाटे लागवड  बटाटे लागवड,  जमीन ,   बटाटे   बियाणे प्रक्रिया,  बटाटे  खते व्यवस्थापन,  बटाट्यावरील कीड व रोग  बटाटा हे कंद वर्गीय प्रमुख भाजीपाला पीक आहे. बटाट्यामध्ये जीवनसत्व ब आणि क भरपूर प्रमाणात असते. त्याच प्रमाणे प्रथिने, चुना फॉस्फरस यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर होतांना दिसतो. बटाट्यामध्ये पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बटाटा हे शक्तिवर्धक सुद्धा आहे. बटाटा हे  कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून या पिकाला योग्य  तसेच नियोजित पद्धतीने लागवड केल्यास कमी कालावधीमध्ये अधिक पैसे मिळवून देणारे पीक ठरू शकते. बटाट्यापासून निरनिराळे खाद्य पदार्थ निर्मिती करता येत असल्यामुळे त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून सुशीक्षित  बेरोजगारांनी आपल्या भागामध्ये प्रक्रिया उद्योग उभारल्यास बेरोज गारीची समस्या दूर करता येऊ शकते.  जमीन मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत तसेच कसदार भुसभुशीत व उत्तम निचर्‍याची जमीन ही  बटाट्याचे उत्पन्न घेण्यासाठी तसेच लागवडीस योग्य असते, लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा

टोमॅटो लागवड

Image
टोमॅटो   टोमॅटो लागवड,  टोमॅटोचे महत्व,  टोमॅटो खते नियोजन,  टोमॅटो रोग माहिती, टोमॅटो फवारणी                        शेतकरी बांधवांनो जसेकी आपल्याला माहीतच आहे की टोमॅटोचे रोजच्या आहारात किती महत्व आहे. तसेच भाजीपाला पिकामध्ये टोमेटोला महत्वाचे स्थान आहे. आपल्या राज्याचे हवामान या पिकास अनुकूल असून जमीन, पीक ( वान ), हवामान, पाणी, खत तसेच पीक संरक्षण व कीड आणि रोगाचे वेळीच नियोजन केल्यास टोमॅटोचे उत्पादन प्रती हेक्टर ६० ते ७० टीन पर्यंत सहज वाढू शकते.           शेतकरी बांधवांनो आताच्या परिस्थिति नुसार वातावरणात सतत होणार्‍या बदलामुळे टोमॅटो पिकावर रोग व किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. बर्‍याचदा अश्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना आपला उभा टोमॅटोचा प्लॉट ( फड ) करपून जातांना पहावा लागतो. या मागील कारण वातावरन हे असुशक्ते परंतु रोगाबद्दल आणि किडीबद्दल अपुरी माहिती तसेच चुकीच्या फवारन्या  हे देखील कारण असू शकते. ( दोन्ही शक्यता नाकारता येत नाही.)  🙏  म्हणूनच शेतकरी बांधवांनो कुठल्याही पिकावर लागणारी कीटकनाशके, बुरशीनाष्के तसेच पिकाच्या अवस्ते नुसार लागणारी खते तसेच संज

हळद लागवड

Image
  हळद लागवड शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्याच्या एकूण हवामानाचा जर विचार केला तर  हळद हे पीक उत्तमरीत्या घेता येते. हळद हे देशातील मसाला पिकात एक प्रमुख व नगदी पीक आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्व मशागती पासून ते हळद प्रक्रियेपर्यंत पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. जमीन  व व्यवस्थापन            हळद या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची तसेच चांगला निचरा होणार्‍या जमिनीची आवश्यकता असते. नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत तसेच सहा ते साडे सात सामु असलेल्या जमिनीत देखील हे पीक उत्तम येते. हळदीच्या लागवडीसाठी भारी काळी, चिकन, क्षारयुक्त आणि पाण्याचा निचरा न होणारी जमीन निवडू नये. अशा जमिनीत हळदीचे कंद चांगले पोसत नाहीत. व कंद कुजीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. सुरूवातीला जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे. हळदीचे खत व्यवस्थापन                                   हळद हे एक कंद वर्गीय पीक असल्यामुळे हळदीला  जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पन्न चांगले मिळते. त्यासाठी एकरी 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत वापरावे. जर शेणखत उपलब्

मिरची लागवड आणि किड व रोग नियंत्रण

Image
 मिरची  वरील किड व रोग नियंत्रण                 आज आपण मिरची वरील कीड व रोग याबद्दल जाणून घेवू. शेतकरी मित्रांनो बाजारात हिरव्या मिरचिस वर्षभर मागणी असते. तसेच भारतीय मिरचीला परदेशातूनही चांगली मागणी आहे. मिरचीमध्ये अ ब आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीचा संतुलित आहारात समावेश होतो. तसेच मिरचीमध्ये फॉस्फर, कॅल्शियम आणि खनिज पदार्थ ही आढळतात. म्हणून मिरचीला रोजच्या आहारात महत्वाचे स्थान आहे. मिरचीमधील तिखटपणा व स्वाद या गुणामुळे मिरचीला मसाल्यामध्येही महत्वाचे स्थान आहे. मिरची या पिकाचा औषधी उपयोग सुधा होतो. मिरची मिरची पिकाची लागवड व हंगाम                               मिरची या पिकाची लागवड उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तीनही हंगामात करता येते. मिरचीला उष्ण व दमट हवामान मानवते मात्र अधिक तापमानात फुले आणि फळे गळतात त्यामुळे अशा वातावरणात जास्त काळजी घ्यावी लागते. मिरचीच्या लागवडी साठी खरीपामध्ये मे महिन्याच्या शेवटी ते जून पर्यन्त रोपे तयार करून त्या रोपांची लागवड जून जुलैत करता येते. रब्बीमध्ये लागवडीसाठी सप्टेंबर ते ऑक्टोंबर पर्यन्त रोपे तयार करून त्या रोपांची पुनर्लागवड ऑ

आले (अद्रक ) पिकातील कीड व रोग व्यवस्थापन

Image
  आले ( अद्रक )                         या पिकाच्या लागवडीसाठी  मध्यम  प्रतीची, भुसभुशीत कसदार तसेच चांगला निचरा होणारी जमीन ही योग्य असते. नदीकाठची  गाळाची जमीन ही कंद वाढण्याच्या द्रुष्टीने  योग्य असतो. जर हलक्या जमिनीमध्ये आल्याची लागवड करायची असल्यास त्यामध्ये भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करावा जेणेकरून अद्रकीचे उत्पन्न चांगल्यापैकी येईल. जमिनीची खोली ही कमीत कमी 30 से. मी. असावी आले ( अद्रक ) आले (अद्रक ) खत व्यवस्थापन                                    आले  या पिकास एकूण १६  अन्नद्रव्यांची कमी आधीक प्रमाणात आवश्यकता असते  . म्हणून खतांचा वापर करतांना संतुलित व प्रमाणातच खतांचा वापर करावा . आले लागवडीच्या वेळी  जमीन तयार करत असतांना हेक्टरी  १२० किलो नत्र ( युरिया ) , ७५ किलो पालाश ( पोटॅश )  आणि ७५ किलो स्फुरद (सुपर फॉस्फेट ) हे लागवडीच्या वेळी द्यावे. आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः १ महिन्याने नत्र ( युरिया ) खताचा निम्मा हप्ता द्यावा. व राहिलेले अर्धे  नत्र हे  २.५ ते  ३ महिन्याने ( उटाळणीच्या वेळी ) द्यावे . त्यावेळी १.५  ते  २ टन  निंबोळ

वांग्यातिल मर व करपा रोग आणि उपाय

Image
वांग्यातिल मर व करपा रोग व उपाय शेतकरी मित्रांनो आपण वांग्यावरील किड व उपाय याबद्दल माहिती पहिली आता आपण वांग्यावर येणार्‍या बुर्शीजन्य व जिवाणू यांच्या मुळे येणारे रोग बघूया  वांग्यातील मर रोग मर रोग :-                   वांग्यातील मर रोग मित्रांनो वांगे लागवड केल्यानंतर बर्‍याचदा वांग्याचे झाडे मरू लगतात या मागील कारण बर्‍याचदा आपल्याला माहीत नसते त्यामुळे कया करावे हे समजत नाही व पीक वाया जाते. यामागे खलील काही कारणांमुळे पिकाला मर लागू शकते मर हा रोग  फुजॅरियम  सोलणी , रायझोक्टोनिया व व्हर्टिसिलिअम   या   बुरशीमुळे  होतो . फुजॅरियम बुरशीमुळे   पिकातील  पाने पिवळी पडतात . पानावरील शिरांवर खाकी  रंगाचे  डाग दिसतात. झाडाचे  खोड मधून कापल्यास   आतील पेशी काळपट दिसतात . झाडाची वाढ खुंटते आणि  शेवटी  झाड  मरते . रायझोक्टोनिया  या बुरशीमुळे झाड बुंध्याजवळ कुजते . व्हर्टिसिलिअम या  बुरशीमुळे   झाडांची  वाढ खुंटते व झाडास फळे लागत नाही . उपाय :-             वांग्यावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रथम फेर पालटिची  पिके घ्यावी . जसे की  टोमॅटो , मिरची, वांगी या पिकांनंतर परत वांगी न घेता ज्

वांग्यावरील कीड रोग व उपाय

Image
🍆🍆   वांगे   🍆🍆 मित्रांनो आज आपण वांग्यावरील कीड व रोग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेवूयात 🍆🍆  वांग्यावरील कीड :- मित्रांनो सुरवातीच्या कळामध्ये वांग्यावर जो कीडीचा प्रादुर्भाव जाणवतो तो म्हणजे पांढरी माशी , तुडतुडे व मावा यांचा प्रादुर्भाव कसा ओळखावा व काय उपाय योजना करावी ते पाहू १ ) तुडतुडे :- तुडतुडे ही कीडी प्रामुख्याने पानाच्या खलील भागावर आढळते, पिले आणि प्रौढ ही पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात तसेच या किटकान मळे पर्णगूच्छ या विशांनुजन्य रोगाचा देखील प्रसार होतो.                               तुडतुडे २ ) मावा :-                 मावा ही देखील रस शोषण करणारी किडी आहे, हे कीटक पानातील रस शोषतात त्यामुळे पाने पिवळी पडतात तसेच पाने चिकट होवून ती काळी पडतात. मावा नियंत्रण आणि उपाय  :-                                     तुडतुडे व मावा या रस शोषण करणार्‍या किडीच्या नियंत्रणासाठी  खलील काही बाबी महत्वाचा ठरतात .  त्यामध्ये सुरवातीच्या काळात पिकामध्ये पिवळा व निळा चिकट ( स्टिकी पॅड ) ट्रेपचा तसेच ईनसेक्ट नेटचा वापर करावा. या नंतर देखील कीड नियंत्रणात येत नसेल त